ॲनिमल प्रिंटची क्रेझ 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

ट्रेंड्‌स
फॅशन विश्वातील क्‍लासिक ट्रेंड म्हणजे ॲनिमल प्रिंट. ई कॉमर्स वेबसाइट्‌सपासून प्रत्यक्ष बाजारपेठा ॲनिमल प्रिंटच्या कपड्यांनी आणि ॲक्‍सेसरीजने भरल्या आहेत. आतापर्यंत बाजारात ॲनिमल प्रिंटमध्ये लेपर्ड प्रिंटची चलती होती. आता यामध्ये रोज नवनवीन फॅशनची भर पडत आहे. या हटके ॲक्‍सेसरीजविषयी... 

  • ॲनिमल प्रिंट मध्ये सध्या लेपर्ड, स्नेक, काऊ, टायगर, झेब्रा अशा ॲनिमल प्रिंटच्या ॲक्‍सेसरीज येतात. या प्रिंटचे कपडे, स्कार्फ, स्कर्ट, टॉप्स, पर्स, बॅग्ज, बूट,जॅकेट्‌स सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. 
  • या ट्रेंड विषयी बोलताना काही नामांकित फॅशन डिझायनर म्हणाले, ॲनिमल प्रिंट हा फॅशन विश्वातील अतिशय वेगाने लोकप्रिय होणारा ट्रेंड आहे. याला मिळणारी लोकप्रियता बघता पुढच्या सहा महिन्यात बहुतेक फॅशन डिझायनरने पुढचे कलेक्‍शन याच धर्तीवर बनवतील. यामध्ये प्रामुख्याने शिफॉन आणि  मिक्‍स धाग्याचे कापड वापरून स्टोल, स्कार्फ डिझाईन केलेले आहेत. 
  • तुम्हाला जर तुमचे वोर्डरॉब कलेक्‍शन बदलायचे असेल तर हे नवे पर्याय जरूर हाताळावे. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला भारदस्तपणा आणण्यासाठी या प्रिंटचा आधार घेऊ नका. एकसारखे आणि थोडे क्‍लासी लूकसाठी हे प्रिंट ट्राय करावा. 
  • ॲनिमल प्रिंट हे शक्‍यतो नॅचरल कलरमध्येच उठून दिसते. जसे की, ग्रे, ब्लॅक, कॅमल आणि ब्लॅक असे रंग. ॲनिमल प्रिंट वापरताना पिंक, रेड असे गडद रंग घेणे टाळावे. याशिवाय या प्रिंटच्या कपड्यांसोबत जास्त चमकणाऱ्या ॲक्‍सेसरीज कॅरी करू नये. मुख्य म्हणजे ॲनिमल प्रिंटच्यासोबत त्याच प्रिंटचा टॉप किंवा जॅकेट घालू नये. यामुळे दोन्ही उठून दिसत नाही. 
  • या प्रिंटचे कपडे दैनंदिन वापरासाठी योग्य नसले तरी.... आऊटिंगला जाताना, पार्टीसाठी जाताना हा पेहराव करणे योग्य ठरेल. ॲनिमल प्रिंटचे शर्ट, किंवा टॉप नेहमी प्लेन आणि नुड कलर्स सोबत पेअर करावे. ॲनिमल प्रिंटचा वनपीस किंवा शर्टवर त्याच प्रिंटचा बेल्ट वापरून लूक बिघडवू नका. न्यूट्रल लूकसाठी एखादा स्कार्फ, शूज या ॲनिमल प्रिंट पेहरावासोबत मॅच करावा. 
  • कॅज्युअल वेअर म्हणून ॲनिमल प्रिंट वापरताना लेपर्ड प्रिंटचे शॉर्ट जॅकेट, सिंपल ब्लॅक जीन्स आणि त्यावर फ्लॅट बॅलेट ट्राय केल्यास उठावदार दिसते. इव्हिनींग पार्टीसाठी जाताना त्यावर गोल्ड हुप्स भन्नाट दिसतात. 
  • महाविद्यालयीन फॅशनप्रेमी तरुणींसाठी ॲनिमल प्रिंट या वर्षात खूप मोठी पर्वणीच असणार आहे. त्यामुळे आऊटडेटेड ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा हे नवे प्रकार सुद्धा ट्राय करावा. 
     

संबंधित बातम्या