नखांचे सौंदर्य वाढवा...

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

ट्रेंड्‌स
मुलींमध्ये विविध कारणांसाठी नेलआर्ट करण्याची क्रेझ असते. मोठ्या नखांमुळे सौंदर्यात आणखी भर पडत असते. तसेच मोठ्या नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळे नखांना वेगळा लुक मिळतो. मात्र नखांच्या सौंदर्याच्या मागे लागून नखांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. तर काहींना कामाच्या गडबडीत नखांची निगा राखणे जमत नाही. त्यामुळे नखांची निगा कशी राखावी, यासाठीच्या सोप्या टिप्स...

बऱ्याच जणींना नखांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती नसते. घरगुती उपायांमार्फत नखांचे आरोग्य चांगले राखता येते. ज्यामुळे तुमची नखे लांब आणि आकर्षक दिसू शकतात. नेलपेंट लावल्यानंतर स्मूद लुक मिळतो.  

आठवड्यातून एकदा तरी हातांना मालिश करावे, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. फक्त हातांनाच नाही तर नखांनाही मालिश आवश्‍यक असते. या क्रियेमुळे नखांची वाढ चांगली होते.  

नेल पॉलिश अधिकाधिक वेळ नखांवर टिकण्यासाठी नेल पॉलिश लावल्यानंतर ती व्यवस्थित वाळवावी. नेल आर्ट करताना गडद रंगाच्या नेलपेंटचे दोन कोट लावावेत. व्यवस्थित वाळल्यानंतर टूथपिकच्या मदतीने नखांवर डिझाइन करावेत. 

नेल पॉलिश जेव्हा नखांवरून निघत असेल तेव्हा टचअप न करता. रिम्हूवर किंवा वाईप्स वापरून ती काढावी. टचअपमुळे नखांचा लुक बिघडतो. 

नखे तुटू नयेत यासाठी सफरचंदाच्या व्हिनेगरचा वापर करावा. यासाठी अर्धा कप सफरचंदाचे व्हिनेगर आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल एकत्र करावे. त्यामध्ये दहा मिनिटे हात बुडवून ठेवावेत. त्यानंतर पाच मिनिटे हलक्‍या हाताने नखांवर मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्याने नखे स्वच्छ धुवावीत. 

ऑलिव्ह ऑइल नखांच्या मजबुतीसाठी चांगले असते. लिंबाच्या रसात थोडे ऑलिव्ह ऑइल मिक्‍स करून नखांना मसाज करावा. यामुळे नखे चमकदार होतात.

नखांची देखभाल करण्यासाठी नारळाचे तेल वापरा नारळाचे तेल नखांसाठी फार फायदेशीर असते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल नखांना लावून मसाज केल्यानंतर नखे मजबूत होतात.घराच्या घरी या सोप्या टिप्सचा वापर केल्यास तुम्हाला ट्रेंडींगमधील नेलआर्ट सहज करता येतील.        

संबंधित बातम्या