ड्रेसिंग्जनुसार वापरा वॉलेट
बुधवार, 21 मार्च 2018
ट्रेंड्स
आजच्या फॅशनच्या काळात स्त्रियांसोबत पुरुषांनादेखील फॅशनचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. पेहराव हा त्यातील एक प्रमुख भाग आहे आणि दुसरा भाग आहे तो ॲक्सेसरीजचा! पुरुषांसाठी ज्या काही आवश्यक अशा ॲक्सेसरीज असतात त्यामध्ये वॉलेट ही एक अत्यंत आवश्यक अशी ॲक्सेसरीज आहे. सध्या बाजारात पुरुषांसाठी कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्ही पेहरावासाठी आकर्षक वॉलेट्स उपलब्ध झाली आहेत. याविषयी...
- प्रत्येक मुलीसाठी जशी ड्रेसला मॅचिंग पर्स ही गरज बनली आहे तशी पुरुषांसाठी देखील पाकिटे (वॉलेट) अत्यंत गरजेची आणि फॅशन ॲक्सेसरीज म्हणून महत्त्वाची आहे. रोख रक्कम, सुटी नाणी, व्हिजिटिंग कार्डस, क्रेडिट कार्डस, डेबिट कार्डस, छायाचित्रे अशा विविध वस्तू ठेवण्यासाठी पाकीट आवश्यक असते.
- बाजारात सध्या लेदर आणि इतर मटेरियलची आकर्षक वॉलेट आली आहेत, परंतु लेदरच्या पाकिटांना जास्त पसंती मिळताना दिसत आहे.
- स्टायलीश दिसण्यासाठी तसेच कार्यालयात जाताना, फ़ॉर्मल पेहरावावर लेदरची वॉलेट्स उठून दिसतात. लेदरची वॉलेट्स मल्टीपर्पज असतात.
- प्युअर लेदर वॉलेट्स तर तरुणांमध्ये ऑल टाइम फेव्हरेट असतात. ही लग्न, रिसेप्शन, फॉर्मल पार्टीज सगळ्या प्रकारच्या सण-समारंभाला वापरता येतात.
- ब्लॅक अँड ब्ल्यू कलरचे वॉलेट्स कोणत्याही रंगाच्या पेहरावासोबत मॅच करू शकते.
- विविध रंगात उपलब्ध असलेल्या या फोल्डेबल वॉलेट्सना तरुणांकडून पसंती मिळत आहे.