ब्रायडल ब्लाऊजेस 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

ट्रेंड्‌स

       
लग्नाच्या दिवशी प्रत्येकीची खूप सुंदर दिसण्यासाठी इच्छा असते. यासाठी आपण सहा महिने आधीपासून तयारी करतो. यामध्ये अगदी छोट्या मोठ्या सगळ्याच ॲक्‍सेसरीज येतात. विशेषतः आपण पेहरावाची खूप काळजी घेतो. सध्या नववधूचा पेहराव हा बहुतेक वेळेला लेहंगा आणि डिझायनर ब्लाऊज असा असतो. या डिझायनर ब्लाऊजमध्ये असंख्य पॅटर्न बाजारात आले आहेत. याविषयी...

शोल्डर लेस ब्लाऊज
तुम्ही शॉर्ट नेटचे फरशीपर्यंत असलेल्या शोल्डर लेस ब्लाऊजची निवड करू शकता. यावर्षी हा पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे. शोल्डर लेस ब्लाऊजच्या स्लिव्हज ओढणीसारख्या असतात.

ऑफ शोल्डर ब्लाऊज  
कोणत्याही प्रकारचा लेहंगा असला तरी त्यावर ब्लाऊज परफेक्‍ट असल्याशिवाय उठून दिसत नाही. सध्या ऑफ शोल्डर ब्लाऊजची फॅशन पुन्हा बाजारात आली आहे. हा पेहराव  तुमच्या प्री वेडिंग फोटोशूट किंवा रिसेप्शन अशा प्रसंगी ट्राय करू शकता. या स्टाईलमध्ये फ्लो फॅब्रिक्‍स, कलर्स, प्रिंट्‌ससोबत मिक्‍स मॅच करू शकता.

जॅकेट स्टाइल ब्लाऊज
तुमच्या लेहंग्यावरती जॅकेट स्टाइल ब्लाऊज बनवू शकता. यामध्ये हाय कॉलर,ओव्हरलॅप्ड लेबल जॅकेट किंवा ’व्ही नेक’ जॅकेटसुद्धा वापरू शकतो. ही स्टाइल स्ट्रेट फिट लेहंग्यावर आणि अंब्रेला कट लेहंग्यावर शोभून दिसतो.

हॉल्टर नेक ब्लाऊज
हॉल्टर नेक ब्लाऊज एकदम कमी वर्क केलेले असतात. हे ब्लाऊज फक्त सिंगल कलरमध्ये असतात. या  पॅटर्नचे ब्लाऊज तुम्ही हेवी वर्क असलेल्या लेहंग्यासोबत मॅच करून तुमचा लुक बॅलन्स करू शकता.

न्यूड ब्लाऊज
बॉलिवूडमुळे न्यूड ब्लाऊज सध्या विशेष ट्रेंडमध्ये आहे. 
यासाठी तुम्ही तुमच्या स्किनटोनला साजेसा नेट ब्लाऊज निवडावा. न्यूड ब्लाऊजची बॉर्डर लेहंग्यानुसार बघून घ्यावी. कॅरी करताना तुम्हाला छान वेगळाच लुक मिळतो. या ब्लाऊजमध्ये डीप नेक, फूल स्लिव्ह्ज किंवा हायनेकही असतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या