टो-नेल आर्ट

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

ट्रेंड्‌स

क्रेझी समर नेल्स
समर स्पेशल डिझाईन्स या प्रकारात वाइल्ड फ्लॉवर, समर फ्रूट, पोलका डॉट्‌स अशा काही फनी कार्टून इमेजेस तुम्ही पायाच्या अंगठ्याच्या नखांवर काढू शकता. या नेल आर्टसाठी तुम्ही बोल्ड आणि वेगवेगळे रंग वापरू शकता. 

मिंट टो-नेल्स
या सिजनमधील हॉटेस्ट कलर ट्रेंडमध्ये मिंट कलर टॉपला आहे. मिंट-टो-नेल्स एकदम प्रिटी लुक देतात. मिंट वेगवेगळ्या रंगासोबत जुळवता येतो. मिंट आणि ऑफव्हाईट, ऑफव्हाईट आणि पॉवर ब्लू कलरसोबत छान दिसतो.

अँकर नेल आर्ट
समर सिजनमध्ये अँकर डिझाइन्सचा ट्रेंड सध्या सगळ्यात टॉपला आहे. अँकर सुरक्षिततेचे प्रतीक आहे आणि ते दुसऱ्या एका डिझाईनवर अवलंबून असते. अँकर डिझाईन तुम्ही स्ट्रीप्सवर, प्लेन कलरवर रेखाटू शकता.

ब्राईट टो-नेल कलर
समर सिजनमध्ये ब्राईट कलर परफेक्‍ट ऑप्शन आहे. या नेल आर्टसाठी निऑन,यलो, डार्क ब्ल्यू हे कलर वापरून गंमतशीर डिझाईन काढल्यास परफेक्‍ट बार्बी-क्‍यू-पार्टी आऊटफिटवर सूट होतात.

बीच टो-नेल्स
समर स्पेशल व्हेकेशनसाठी पेडिक्‍युअर करून बीच थीमने सजवावे. समर सीझन लक्षात घेता पूल, बीच पार्टीसाठी जाताना हे प्रकार कूल दिसतात.

लेडीबग टो-नेल आर्ट
या लकी मानल्या जाणाऱ्या सिम्बॉलकडे जराही दुर्लक्ष करू नका. पायांच्या बोटांवरील नखांवर हे लेडीबाग डिझाईन खूपच क्‍यूट दिसते. हा छोटासा कीटक नखांवर रेखाटण्यासाठी रेड- ब्लॅक कॉम्बिनेशनच फक्त सूट होते. नाईट पार्टीला जाताना हे नेले आर्ट काढणे सोपे आणि छान दिसते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या