पायमोजे - स्टाइल स्टेटमेंट
फॅशनच्या दुनियेत आपण काही ठराविक ॲक्सेसरीजनाच नेहमी प्राधान्य देतो. पण हल्ली पायमोजे हे सुद्धा सर्रास वापरली जाणारी ॲक्सेसरीज आहे. मोजे हे केवळ पादत्राण्यांना साजेसे नाही तर वेगवेगळ्या आऊटफिटसवर साजेसे पायमोजे घालतात. आज आपण फॅशन म्हणून मोजे पेहरावात किती महत्त्वाचे ठरतात हे बघूया.
मॅक्सी ड्रेस आणि सॉक्स
वेस्टर्न आऊटफिटसवर ही मोज्यांची फॅशन उठून शोभून दिसते. मॅक्सी ड्रेस आणि पायमोज्यांचे कॉम्बिनेशन उत्तम उदाहरण आहेत. लाँग सोम्ब्रे ड्रेस, न्यूड शूज आणि त्यावर ब्राईट कलरचे मोजे घातल्यास पेहराव उठून दिसेल.

सॉक्स आणि पलाझो पॅंट्स
हल्ली पलाझो पॅंट्स आणि त्यावर फॉर्मल शर्ट किंवा टीशर्ट घालण्याची फॅशन इन आहे. त्यामुळे या पलाझो पॅंट्ससोबत कोणतेही कॉम्बिनेशन करून बघू शकता. पायमोजेदेखील गडद रंगाच्या पलाझो पॅंट्सवर लाइट पेस्टल रंगाचे मोजे आणि शूज उत्तम कॉम्बिनेशन जुळते.
सेमी फॉर्मल आणि पायमोजे
फॉर्मल पेहरावरील पायमोजे वेगळे आणि सेमी फॉर्मलवरील मोजे हे थोडे वेगळे असतात. बहुतेक वेळा सेमी फॉर्मल्सवर वेगळ्या प्रकारचे मोजे वापरल्यास थोडा वेगळा लुक येतो.
मोजे आणि ब्रायडल वेअर
हा थोडा कस्टमाइज कलेक्शनमध्ये मोडणारा प्रकार आहे. वेडिंग गाऊन सोबत मोजे पेअर केल्यास एकसंधपणा मोडण्यास मदत होईल.
एकाच रंगाचे मोजे आणि पादत्राणे
पूर्वी जशी प्रत्येक पेहरावावर त्याच रंगांच्या ॲक्सेसरीजची घालण्याची फॅशन होती तसेच आता थोड्या फरकाने पायमोज्यांच्या बाबतीत ही लागू होत आहे. पादत्राणांचा रंग आणि मोज्यांचा रंग साधारण जवळपास असल्यास गुलाबी रंगाचे मोजे आणि लाल रंगाचे पादत्राणे, गडद निळ्या रंग आणि ब्राऊन रंगाच्या पादत्राण्यांसोबत पेअर केल्यास उठून दिसतात.
समर सीझनमध्ये ग्लिटर मोजे
समर सीझनमध्ये तुमचा लुक एकदम खास दिसण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हे उंच टाचेच्या हिल्सबरोबरहे ग्लिटर मोजे खूपच सुंदर दिसतात. हे मोजे एखाद्या वनपीसबरोबर नाईट पार्टीला जाताना देखील उठून दिसतील.