एव्हरग्रीन नेलपेंट्स

समृद्धी धायगुडे  
गुरुवार, 22 मार्च 2018

ट्रेंड्‌स  

तुमच्या मैत्रिणीच्या, बहिणीच्या, भावाच्या, मित्रांच्या लग्नकार्याला जाताना किंवा एखाद्या रिसेप्शन, पार्टीसाठी खरेदी करताना पहिले प्राधान्य नेहमी आपण कपडे, पादत्राणे, हेअरस्टाइल, अशा ॲक्‍सेसरीजना देतो. समजा महिन्याभराने संबंधित कार्यक्रम असेल तर त्याची तयारी कपड्यांपासून सुरू होते. ही तयारी करताना जर तुमच्या हातात पुरेसा वेळ असेल तर तुम्ही कपड्यांसोबतच ट्रेंडी नेलपेंट खरेदी करू शकता. तुमच्या हाताचे सौंदर्य केवळ दागिन्यांनी नाही तर नेलआर्टने, आकर्षक रंगाच्या नेलपेंटने उठून दिसते. एखादे ट्रेंडी नेलपेंट तुमचा लुक एकदम बदलून टाकते. 

दररोजच्या घाई गडबडीत आपल्याला नेलपेंट बदलायला अजिबात वेळ नसतो तरी जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा अशा काही रंगांची निवड करून आणा की, जे कधीच आऊटडेटेड होणार नाहीत आणि तुमच्या सर्व पेहरावावर शोभतील. फक्त पेहरावाचे स्वरूप आणि रंग बघून ही निवड करावी. 

ऑक्‍स ब्लड
तुमच्या हातांना ऑक्‍स ब्लड कलरच्या नेलपेंटनी क्‍लासी लुक येतो. लग्नामध्ये जाताना विशेषतः ब्राऊन, रेड कलरच्या साडी किंवा लेहंग्यावर हे नेलपेंट खास उठून दिसते. नववधूपासून ते करवलीपर्यंत प्रत्येकीच्या बोटांना हे शोभून दिसते.

ग्रीन  
तुम्ही जरा पांढरा, ऑफव्हाईट किंवा ग्रीन कलरचा ड्रेस घातला असेल तर या रंगाचे नेलपेंट खास दिसते. एखाद्या नाईट पार्टीला जाताना ग्रीन वनपीसवर हे नेलपेंट ’चारचाँद’ लावते. 

गोल्डन  
ब्रायडल लेहंगा किंवा घागरा, पारंपरिक पेहरावावर हमखास उठून दिसणारा रंग म्हणजे गोल्डन ! या रंगांनी तुमच्या हाताचे सौंदर्य वाढत नाही तर तुम्हाला एक रॉयल लुक देते. हा रंग तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोल्डन बॉर्डर साडी किंवा लेहंग्यावर शोभून दिसते. 

पिंक
तसे पाहायला गेले तर पिंक कलर प्रत्येक मुलीच्या संग्रही असतोच पण तो आता विविध कौटुंबिक सोहळ्यामध्येही दिसतो. मात्र या विशेष सण समारंभात ग्लॉसी पिंक कलर नेलपेंट लावून हातांचे सौंदर्य आणखी खुलवू शकता. हा रंग केवळ पीक कलरच्याच आऊटफिटवर 
वापरावा आणि लक्षात ठेवा मॅट न वापरता ग्लॉसी वापरा. 

ऑरेंज
कोणत्याही समारंभात पारंपरिक पेहरावावर नेलपेंट लावणे ही सामान्य बाब आहे. मात्र यामध्ये तुमचे वेगळेपण उठून दिसण्यासाठी ऑरेंज कलरचे नेलपेंट तुम्हाला मदत करेल. हा रंग तुम्ही रॉयल ब्ल्यू, हॉट पिंक, ग्रीन कलरसारख्या पारंपरिक पेहरावासोबत मॅच करावा.  

    वरील सर्व कलरची नेलपेंटस संग्रही ठेवली तर सण-समारंभाच्या प्रसंगी आयत्यावेळी धावाधाव करावी लागणार नाही. याशिवाय नामांकित ब्रॅण्डसची खरेदी केल्यास ती दीर्घकाळ टिकतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या