सुंदर व आकर्षक केशभूषा

समृद्धी धायगुडे 
गुरुवार, 3 मे 2018

ट्रेंड्‌स

लग्न समारंभात प्रत्येक नववधू आपली हेअरस्टाइल कशी उठून दिसेल याकडे लक्ष देते. लग्नानंतर होणाऱ्या घरगुती कार्यक्रमात किंवा सुरवातीच्या दिवसात नवविवाहित दाम्पत्याकडे विशेषतः नववधूकडे सर्वांचे लक्ष असते. अशा वेळी खास पेहराव आणि केशरचना केल्यास नववधूच्या सौदर्यांला झळाळी मिळते. 

  • आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये जसे कपडे महत्त्वाचे असतात तशीच केशरचनादेखील महत्त्वाची असते. हेअर स्टाइल जर चुकीची केली तर तुमचा लुक बिघडू शकतो. खास समारंभ असेल तर आपण पार्लरमध्ये जातोच पण घराच्या घरी जर पटकन आणि सुंदर हेअरस्टाईल करता येत असेल तर काळजीचे काहीच कारण नाही. आज आपण सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल बघूया. 
  • भारतीय पेहरावावर ही केशरचना अतिशय छान दिसते. यासाठी एका बाजूचे केस ट्विस्ट करून फ्रेंच रोल करून पिनअप करावे. तो खोट्या किंवा खऱ्या फुलांनी सजवावा. ही केशरचना आणखी खुलविण्यासाठी तुम्ही इतर ॲक्‍सेसरीजदेखील वापरू शकता.
  • बाहेर आऊटिंगला जाताना वेस्टर्न आऊटफिटवर अभिनेत्री आलिया भटसारखी केशरचना करू शकतो. हेअरबन अतिशय क्‍युट लुक देतो. ही केशरचना करायला देखील अतिशय सोपी आहे. 
  • तुम्हाला जर हेअर कलर आवडत असेल त्यासोबत फुले किंवा गाजरे घालून सजविता येईल. ही हेअरस्टाइल वेस्टर्न आणि भारतीय पेहरावावर सुंदर दिसते. या हेअर स्टाईलने ग्लॅमरस लुक मिळवू शकता.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या