फॅशनेबल ऑफिस वेअर

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 11 मे 2018

ट्रेंड्‌स

नोकरदार महिलांना रोज ऑफिसला जाताना काय फॅशन करायची हे समजत नाही. अशा महिलांसाठी फॉर्मल्स वेअर वापरूनही आकर्षक कसे राहता येईल याच्या काही टिप्स.
 

पेन्सिल स्कर्ट वापरून केवळ ऑफिससाठी नाही तर एक ट्रेंन्डसेटर लुक परत मिळवू शकतो. या प्रकारात प्रत्येक साईजमधील स्कर्ट उपलब्ध आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट घालून तुम्ही फॅशन करू शकता. बहुतेक महिला कॉर्पोरेट कंपनीत पेन्सिल स्कर्ट घालण्याला प्राधान्य देतात. या स्कर्टवर बटणाचा शर्ट उठून दिसतो. या स्कर्टवर शर्ट इन करून फॉर्मल बेल्ट लावल्यास आपण आकर्षक लुक मिळवू शकतो. हा लुक थोडासा मजेशीर पद्धतीने सादर करण्यासाठी बूट आणि सॉक्‍सचा वापर करावा. 

 कॅज्युअल लूकसाठी उंचीला थोडा मोठा पेन्सिल स्कर्ट निवडावा. त्याच्यासोबत पांढरे स्निकर्स घालू शकतो. या स्कर्टसोबत हाय हिल्स सुंदर दिसतात. सध्या बऱ्याच तरुणी या स्कर्टला प्राधान्य देतात. या स्कर्टमधील फ्लोरल डिझाईन फ्रेश लुक देते. यावर ॲक्‍सेसरीजमध्ये मोत्याचा नेकपीस, झुमके ट्राय करू शकतात. या ॲक्‍सेसरीज तुम्हाला फॉर्मल्समध्येही नवी फॅशन करण्याची संधी देतात. हाय हिल्समुळे या पेहरावाला परफेक्‍ट कॉर्पोरेट लुक मिळतो. यामुळे हा फॉर्मल पेन्सिल स्कर्ट तुम्ही सहज कार्यालयात घालू शकता. 

 सध्या क्रॉप टॉप आणि कोल्ड शोल्डर टॉप ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करता येते. एम्ब्रॉयडरी असलेला पेन्सिल स्कर्ट क्रॉप टॉपसह घातल्यास छान दिसतात. हे स्कर्ट तुम्ही फॉर्मल नाईट पार्टीसाठी जाताना देखील घालू शकता. चमकणाऱ्या पेन्सिल स्कर्टसोबत चेक प्रिंट टॉप घालू शकता. यावर एक मोठे जॅकेट घालणे फॅशन स्टेटमेंट झाले आहे. या पेहरावात लेअरिंग करणे उठावदार दिसते. जर तुम्ही छोटा पेन्सिल स्कर्ट घालेण्यांचे ठरवले तर त्यावर मोठे शूज,हाय हिल्स घालण्याला प्राधान्य द्यावे. 

 उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही डेनिम पेन्सिल स्कर्ट ट्राय करू शकता. हा स्कर्ट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कॅरी करू शकता. या स्कर्टवर शर्ट, टॉप,लूज शर्ट, टॅंक टॉप सोबत सहज घालू शकता.  यांचे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगला लुक देते. ब्लॅक पेन्सिल स्कर्टचा चांगला पर्याय तुमच्या समोर आहे. कॅज्युअल आऊटिंगपासून पार्टी वेअरपर्यंत सगळीकडे वापरू शकता. यावर तुम्ही श्रग किंवा प्रिंटेड शर्ट, हॉल्टर नेक टॉपसोबत घालू शकता.   

 तुम्ही समर सिजनमध्ये ही फॅशनेबल राहण्यासाठी या वेगवेगळ्या फॉर्मल स्कर्टचा तुमच्या कलेक्‍शनमध्ये समावेश करू शकता.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या