कूल कुर्ते  

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 18 मे 2018

ट्रेंड्‌स
 

फॅशनच्या दुनियेत रोज काय नवीन येईल किंवा जुनेच नव्याने येईल हे सांगता येत नाही. बऱ्याच तरुणींना बोअरिंग वाटणारे कुर्ते या समर सीजनमध्ये कॅज्युअल किंवा पार्टीसाठी जाताना उत्तम पर्याय ठरतो. प्रचंड उकाड्यात हे कॉटन कुर्ते तुम्हाला चांगला कम्फर्ट देतात. हिवाळ्यात जे कुर्ते तुम्ही स्वेटर किंवा जॅकेट्‌स घालून झाकता तेच कुर्ते मोकळेपणाने उन्हाळ्यात घातल्यास जास्त सुंदर आणि कंफर्टेबल असतात. याविषयी  

स्लीव्हलेस अनारकली कुर्ते
एखाद्या खासगी कुटुंबातील समारंभाला जाताना किंवा एखाद्या सणावारी घालण्यासाठी कॉटनचे स्लीव्हलेस अनारकली कुर्ते खास उठून दिसतात. या कुर्त्याला खाली ब्रॉड लेस असल्यास आणखी उठून दिसते. 

कॅज्युअल कुर्ते
कॅज्युअल लुक मिळविण्यासाठी प्रिंटेड स्लीव्हलेस कुर्ते जरूर निवडावेत. कॅज्युअल कुर्त्यांमध्ये असिमेट्रिक हेमलाइन स्टाइल कॉन्ट्रास लेगिंग्ज ट्राय करावी. नोकरदार महिलांना फॉर्मल ड्रेस अनिवार्य नसेल तर हे कुर्ते नक्की ट्राय करावे. 

कुर्ती विथ श्रग
ट्रेंडी आणि वेगळ्या लुक मिळविण्यासाठी प्रिंटेड कुर्ते विथ श्रग घालावे. हे मॅडरिन कॉलरसारखा लुक दिला आहे. हे कुर्ते पलाझोसोबत पेअर करू शकता. 

एम्ब्रॉयडरी कुर्ते
सिंपल आणि इलिगंट लूकसाठी हॅंड एम्ब्रॉयडरी केलेले स्लीव्हलेस कुर्ते वापरून बघावे. चिकनकारी वर्क केलेले कुर्ते धोती पॅंट्‌स, पटियाला, डेनिमसोबत वापरू शकतो. 

व्हायब्रंट कलर 
हा निळा कुर्ता समोरून दिसत असला तरी त्याला समोरून दोन कट असतात. हे कुर्ते फिटेड पॅन्ट किंवा पलाझोसोबत छान दिसतात.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या