फॅशन समर सॅंडल्सची

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 24 मे 2018

ट्रेंड्‌स

उन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतो. यामध्ये कपडे ही महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यानंतर इतर ॲक्‍सेसरीज. उन्हाळ्याचा खूप त्रास होत असेल तेव्हा पादत्राणेदेखील योग्य वापरणे गरजेचे असते. उन्हाळ्यात मऊ चामड्यापासून केलेली पादत्राणे वापरणे योग्य ठरते. यामुळे पायांना दुर्गंधी येत नाही तसेच कोणतेही संक्रमण होत नाही. जेव्हा पायांची काळजी घेण्याची वेळ येते, तेव्हा खूप जड पादत्राणे घालू नये. त्यामुळे पायापर्यंत हवा पोहोचत नाही. उन्हाळ्यात कोणत्या प्रकारची पादत्राणे वापरावीत याविषयी... 

लोफर्स
उन्हाळ्यात सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे लोफर्स. समर स्पेशल सिजनमध्ये ॲथलेटिक सॅन्डल,लोफर्स वापरायला हलकी असतात. सध्या बाजारात मऊ चामड्याची बरीच पादत्राणे उपलब्ध आहेत. ही वापरून तुम्ही तुमचा उन्हाळा सुसह्य करू शकता. या चामड्याच्या पादत्राण्यांमध्येसुद्धा बरीच कलरफुल आणि नावीन्यपूर्ण डिझाईन्स आली आहेत.   

ट्रेंडी सॅंडल
उन्हाळ्यात वेगवेगळ्या रंगाची पादत्राणे पायांमध्ये शोभून दिसतात. कोणत्याही पार्टीसाठी जाताना या प्रकारचे सॅन्डल जरूर तरी वापरावेत. गुलाबी,नारंगी, पीच यासारखे भरपूर रंग यामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये स्ट्रीप,रिबन, बीड्‌स,लटकन, रेशमी धागे, गोंडे यांचा वापर करून डिझाईन केले जातात. या डिझाईनचे सॅंडल्स उन्हाळ्यात तुम्हाला कुल लुक मिळवून देतील. 

कलरफुल हिल्स
तुम्हाला जर उंच टाचेचे बूट घालायला आवडत असतील तर त्यासाठीसुद्धा कलरफुल पादत्राणे बाजारात उपलब्ध आहेत. हे तुम्ही प्लॅन शर्ट किंवा टीशर्ट, जीन्स सोबत मॅच करू शकता. हिरवा, पर्पल, पिवळा यांचे मिक्‍स ॲण्ड मॅच कॉम्बिनेशनमध्ये हाय हिल्स सॅन्डलचा पर्याय तुम्ही निवडू शकता.  

प्रिंटेड फ्लॅट शूज
तुम्हाला जर हाय हिल्सपेक्षा फ्लॅट शूजमध्ये जास्त कम्फर्ट वाटत असेल तर तुमच्यासाठी देखील आरामदायी प्रिंटेड शूज उपलब्ध आहेत. तुम्हाला स्टाइल म्हणून प्रत्येक वेळी हाय हिल्सचं वापरले पाहिजेत असे काही नाही. हे शूज उन्हाळ्यात तुम्हाला स्टाईलबरोबरच कम्फर्ट लुक देतात. यावरील प्रिंट्‌स निवडताना ड्रेसनुसार निवडावी.

हाय ग्लॅडिएटर सॅंडल
उन्हाळ्यात बहुतेक तरुणी शॉर्टस किंवा मिनी स्कर्ट घालण्यावर भर देतात. अशा कपड्यांसोबत घोट्यापर्यंत असलेले ग्लॅडिएटर्स सॅंडल्स खूप छान दिसतात. अशा प्रकारची पादत्राणे कॅज्युल्सवर घातली जातात. या सॅंडल्समुळे तुम्हाला एकदम कुल लुक आणि फॅशनेबल दिसण्यासाठी मदत होते. 

ॲथलेटिक सॅंडल्स
या सिजनमध्ये ॲथलेटिक सॅंडल्स वापरणे सोयीचे असते कारण, यामुळे पाय एकदम हलके राहतात. या सॅंडल्समुळे स्टायलिश दिसण्यासाठी मदत होते. या पादत्राणांचे वैशिष्ट्य म्हणजे हे फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्हींवर उठून दिसतात.

फ्लिप फ्लॉप
उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे फ्लिपफ्लॉप स्लीपर्स. बाजारात सध्या यामध्ये भरपूर व्हरायटी दिसतात. यामध्ये कापडी वेलवेट, फर, लाकडी, प्लॅस्टिक असे पर्याय उपलब्ध आहेत. उंच टाचेच्या चपलांमुळे जसे पाय दुखतात तसे या फ्लिपफ्लॉपमुळे दुखत नाहीत. 
 

संबंधित बातम्या