साडीचा मेकओव्हर

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 7 जून 2018

ट्रेंड्‌स
 

प्रत्येक वयाच्या महिला मंडळाचा आवडता पेहराव म्हणजे साडी. पारंपरिक साडी ते वेस्टर्न स्टाईलपर्यंत या साडीचे अनेक प्रकार हल्ली आपण बघतोच. यापैकी प्रत्येक प्रकार ट्राय करून तुम्ही क्‍लासी आणि चार्मिंग लुक मिळवू शकता. आज आपण आपल्याकडील साध्या डिझायनर साडीचा थोडा आणखी मेकओव्हर करून स्टायलिश लुक मिळवू शकता. आज आपण प्लॅन साडीचा मेकओव्हर कसा सोप्या पद्धतीने करता येईल हे बघूया.

     दरवेळी प्लेन साडीवर ब्रोकेड ब्ला@ऊज घालून कंटाळा आला असेल तर साडीचा लुक बदलावा. यासाठी तुम्हाला कॉन्ट्रास रंगाचे गोंडे लागतील. यामुळे केवळ तुम्ही साडीला नवा लुक नाही तर ट्रेंडीसुद्धा बनवू शकता. 

     प्लेन साडी आणि त्याच्या ब्लाऊजवर वर्क केलेले असेल, तर त्या ब्लाऊजला मॅचिंग रंगाचे गोंडे तुम्ही केवळ समोरच्या बाजूला येणाऱ्या काठाला लावू शकता. बंद गळ्याचे ब्लाऊज आणि त्यावर फिकट रंगाचे गोंडे स्लिव्ह्जला लावल्यास ऑफिस वेअर म्हणूनही मिटींगला जाताना अशा साड्या आपण नेसू शकतो. 
  
     गोंड्यांचे डिझाईन केवळ डिझायनर साड्यांवर करू शकता असे नाही. खादीच्या साड्यांनासुद्धा पदराच्या शेवटी काठाच्या रंगाचे आकर्षक गोंडे आपण लावू शकतो.

     बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच अशा प्रकारच्या साडीमध्ये दिसली. तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या साड्यांवर थोडा हटके पद्धतीचा ब्लाऊज ट्राय केलात, तर एखाद्या रिसेप्शनसाठी परफेक्‍ट लुक तुम्ही मिळवू शकता. 

     गोंड्यांचा वापर करून तुम्ही केवळ साडीचे काठ नव्हे, तर मधल्या भागांवर किंवा स्कर्ट बॉर्डरलादेखील गोंडे लावून सोबत साडीला क्‍लासी लुक देऊ शकता.

     साडीचा रंग बघून त्यावर दोन-तीन वेगळ्या रंगांचे गोंडे एका ठराविक अंतराने लावल्यास साडीचा स्कर्ट बॉर्डर, पदर, समोर दिसणारा काही भाग यावर सहज लावू शकतो. 

     सध्या स्टोलपासून साडीपर्यंत, हेअर ॲक्‍सेसरीजपासून पादत्राणांपर्यंत सगळ्यामध्ये गोंडे भाव खात आहेत. मग याच फॅशनच्या आधाराने तुम्ही चारचौघींमध्ये स्टायलिश आणि हटके दिसू शकता.

फोटो फीचर

संबंधित बातम्या