कलरफुल डेनिम 

समृद्धी धायगुडे
गुरुवार, 28 जून 2018

ट्रेंड्‌स
 

प्रत्येक तरुणांच्या वॉर्डरोबमध्ये डेनिम असतेच. यामध्ये शक्‍यतो ब्लू आणि ब्लॅक हे दोनच रंग दिसतात. पण सध्या बाजारात ’कलर डेनिम’चा भन्नाट ऑप्शन तुमच्यासमोर आहे.  ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुर्त्यावर लेगिंग्ज मॅच करतो, तसेच या कलर डेनिमदेखील सहज मॅच करू शकतो. या कलर डेनिमचा नवा पर्याय तुमच्या पेहरावात कसे नावीन्य आणेल याची माहिती घेऊ.

योग्य साइज निवडावा
कोणत्याही प्रकारची जीन्स घेताना कमरेची साईज नीट तपासून घ्यावी. कलर डेनिम घेताना आपल्या आपल्या शरीराची ठेवण कशी आहे त्यानुसार डेनिम निवडावी. विशेषतः ब्लू जीन्स, स्कीन-फिट निवडताना ही काळजी घ्यावी. कलर डेनिम रेग्युलर फिटिंगमध्येही उपलब्ध असते. अशा डेनिम सर्व बॉडीटाईपवर शोभून दिसतात.

फॅब्रिक
कलर डेनिम घेताना त्याची गुणवत्ता तपासावी. जेव्हा आपण डेनिम घालतो, ती बराच वेळासाठी आपल्या त्वचेला चिकटलेली असते. त्यामुळे त्याचे कापड आणि फिटिंग बघून घ्यावे. शक्‍यता कॉटनचा वापर जास्त असावा जेणेकरून उन्हाळ्यात आणि त्वचेला फारसा त्रास होत नाही. बदलत्या ऋतूनुसार डेनिमचे कलेक्‍शन करावे. उन्हाळ्यात शक्‍यतो हलक्‍या डेनिम वापरू शकता. ‘मीडियम वेट डेनिम’ या एव्हरग्रीन असतात. जास्त वजनाच्या डेनिम शक्‍यतो हिवाळ्यात वापराव्यात. कलर डेनिम आपल्याला नेहमीच स्टायलिश लुक देतो. पण एकाच रंगाचे टॉप आणि बॉटम वेअर चुकूनही वापरू नये.

रंगांची निवड कशी करावी?
कलर डेनिम निवडताना आपल्या त्वचेच्या रंगाला साजेशी डेनिम घ्यावी. आपण त्यावर शर्ट, टी-शर्ट, टॉप घालताना शक्‍यतो काँन्ट्रास निवडावा. डेनिमचा कलर तो कोणत्या प्रसंगी घालणार त्यानुसार ठरवावा. जसे की, ऑफिसला जाताना, आऊटिंग, पार्टीला जाताना जसे कारण असेल तशी डेनिम निवडावी. आपल्या त्वचेच्या रंगाला शोभेल असा डेनिमचा रंग निवडावा, कारण अनेक कलर्सची रेंज बाजारात उपलब्ध आहेत. आपण डेनिम कोणत्या प्रकारचा टॉप किंवा शर्ट घालणार आहेत त्यानुसारच डेनिमची निवड करावी. ऑफिसमध्ये शक्‍यतो गडद रंगाची डेनिम वापरली तर एखादा चेक्‍स किंवा प्लेन टॉप किंवा टी-शर्ट वापरावे. फिकट रंगाची डेनिम असल्यास त्यावर फ्लोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लुक देतो. न्यूट्रल कलर, जसे की सफेद, ग्रे रंगाचे टॉप डार्क कलरच्या डेनिमवर सूट होतात.
पार्टी ऑफिस किंवा एखाद्या ट्रिपमध्ये सर्वांत हटके दिसण्यासाठी कलर डेनिम हा बेस्ट ऑप्शन आहे. हल्ली बरेच यंगस्टर्स स्टायलिश दिसण्यासाठी कलरफुल डेनिमला पसंती देतात. जेव्हा तुम्ही एखादी डेनिम निवडता, तेव्हा ती केवळ फिटिंग किंवा कलरनुसारच नाही, तर डिझाईन व स्टायलिंग दोन्ही शोभणे महत्त्वाचे असते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या