युनिक ज्वेलरी 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

ट्रेंड्‌स
ज्वेलरीची क्रेझ कधीच कमी होत नाही. सध्या ज्वेलरीमध्ये खूप अनोखे ट्रेंड्स आले आहेत. पारंपरिक चिंचपेटी किंवा राणीहारालादेखील नवा साज चढवून त्यांची शान वाढविता येते. नवीन ट्रेंडी दागिन्यांमध्ये सोन्याची पारंपरिक गळ्यातली, कानातली तसेच इमिटेशन ज्वेलरीदेखील उपलब्ध आहे.

  • पारंपरिक दागिन्यांमधील उठावदार टेंपल ज्वेलरीमध्ये पदकांच्या जागी गणपती आणि लक्ष्मी, कृष्ण, शिव साकारलेले दिसतात. यात आता आणखीन भर पडत आहे ती म्हणजे दशावतारांची. पृथ्वीवर जेव्हा अराजकता माजली त्यावेळी विष्णू देवांनी दशावतार घेतला असे मानले जाते. या अवतारांचे युनिक कलेक्शन बाजारात आले आहे. 
  • तुमच्या आवडीनुसार आणि व्यक्तिमत्त्वानुसार यातील डिझाइन्स तुम्ही निवडू शकता. कॉटन, खणाच्या, सिल्कच्या आणि दाक्षिणात्य पेहरावावर ही डिझाइन्स खास छान दिसतात. डिझाइन्स अमेरिकन डायमंड, सिल्व्हरमध्येदेखील उपलब्ध आहेत. यात केवळ गळ्यातले नाही, तर कानातले, अंगठी, छोटी पेंडन्ट्‌स यांचाही समावेश आहे. या पेंडन्ट्सना एक नाजूक चेन किंवा माळ जोडली, की ही ज्वेलरी वेस्टर्न आउटफिटवरही घालता येईल.
  • टेंपल ज्वेलरीला चढवलेला हा आधुनिक साज तुमच्या पसंतीस नक्कीच उतरेल. या ज्वेलरीची दुसरी खासियत म्हणजे वर्षभर कोणत्याही सणाला तुम्ही हे दागिने परिधान करू शकता. 
  • या प्रकाराची ज्वेलरी ऑनलाइन बाजारात तसेच विशिष्ट ज्वेलरी स्टुडिओ किंवा ज्वेलरी डिझायनरकडेच उपलब्ध आहे.  

(समाप्त)
 

संबंधित बातम्या