हेअरकटने खुलवा सौंदर्य

समृद्धी धायगुडे
सोमवार, 18 मार्च 2019

ट्रेंड्‌स
आपली हेअरस्टाइल आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. बऱ्याचदा चांगले कपडे घालूनही हेअरस्टाइल चांगली नसेल, तर सगळा लुक फसतो. अनेकदा तरुणींना कॅज्युअल, वेस्टर्न अशा प्रकारच्या पेहरावांवर कोणती हेअरस्टाइल करावी, हे कळत नाही. त्यासाठी इथे छान पर्याय दिले आहेत. चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरस्टाइल ट्राय करू शकता...

 • मीडियम लेन्थ विथ लेअर्स : या हेअरस्टाइलने तुम्हाला ग्लॅमरस लुक मिळेल. मीडियम लेंथच्या हेअरस्टाइलने केसांची आकर्षक ठेवण होते.
   
 • मीडियम लेन्थ इन्व्हर्टेड बॉब : या हेअरस्टाइलमध्ये तुमचे केस पुढच्या बाजूला लांब आणि मागे लहान ठेवले जातात. त्यामुळे तुम्हाला हटके लुक मिळतो. हा लुक फॅशनेबल दिसण्यासाठी फायदेशीर ठरतो.  
   
 • मीडियम लेन्थ विथ सेंटर पार्ट : या हेअर स्टाइलमध्ये तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स उठून दिसतात. त्यामुळे तुम्ही आणखी आकर्षक दिसता.
   
 • मीडियम लेन्थ विथ व्हॉल्युम आणि बॅंग्ज : या केशरचनेत केसांना बऱ्याच लेअर्समध्ये कापले जाते. त्यामुळे चेहऱ्याचा एक नवीन शेप दिसतो. ज्या तरुणींचे केस पातळ असतात त्यांनाही उठून दिसेल.
   
 • मीडियम लेन्थ स्ट्रेट ब्लंट लॉब : ही हेअरस्टाईल केल्याने हॉट लुक मिळवण्यासाठी मदत होईल. या केशरचनेची खास बाब म्हणजे  ती कोणाच्याही चेहऱ्याला सूट होते.
   
 • मीडियम लेन्थ विथ मेस्सी वेव्ह : ज्या मुलींना सतत केस आवरण्यात वेळ घालवायचा नाही, त्यांना रफटफ लूकसाठी ही हेअरस्टाइल एक चांगला पर्याय आहे.
   
 • मीडियम लेन्थ विथ ब्लॉन आउट लेअर्स : ज्या तरुणींना जास्त व्हॉल्युम आणि बाऊन्सी केस हवे असतील, त्यांना हा हेअरकट सोज्वळ लुक मिळवून देऊ शकतो. आजकाल बऱ्याच तरुणी या केशरचनेला प्राधान्य देतात.  
   
 • ब्लंट फ्रीन्ज बॅंग्ज : ही हेअरस्टाइल क्‍लासी लुक मिळवून देण्यास मदत करते. तुम्ही जर कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करत असाल, तर ही हेअरस्टाइल जरूर ट्राय करा. 

संबंधित बातम्या