ग्लोइंग निऑन कलर 

 समृद्धी धायगुडे
सोमवार, 25 मार्च 2019

ट्रेंड्‌स
फॅशन विश्वात कोणत्याही रंगाचे किंवा स्टाइलचे बंधन नाही. बॉलिवूडमध्ये सध्या बरेच सेलेब्स निऑन कलरच्या कपड्यांना आणि ॲक्‍सेसरीजना प्राधान्य देताना दिसत आहेत. होलीनिमित्त या अनोख्या आणि ब्राईट कलरच्या ट्रेंडविषयी जाणून घेऊ...

  • निऑन कलर ब्राईट असल्याने तो सिंगल किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रंगाबरोबरदेखील उठून दिसतो. या रंगातील कपडे वेस्टर्न, कॅज्युअल, जिम वेअर अशा कोणत्याही प्रकारात उठून दिसतात. 
  • बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट, अभिनेता आयुष्मान खुराना, नवोदित अभिनेत्री सारा अली खान, हॉलिवूड मधील बेल्ला, केंडल जेन्नर यांनाही या रंगाची भुरळ पडलेली दिसते. काही दिवसांपूर्वी सारा अली खानचा जिम लुक या निऑन रंगांच्या कपड्यांमुळे चर्चेत होता. 
  • काही फॅशन डिझायनर्सच्या मते, या रंगाची फॅशन ऐंशीच्या दशकातील शेड्‌सपासून प्रेरणा घेते. हा रंग स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवतो. तुम्हाला तुमचा पोशाख अपूर्ण वाटत असेल, तर तो या रंगामुळे परिपूर्ण दिसतो. 
  • निऑन कलर हा एक फॅन्सी आणि मजेशीर रंग आहे. त्यामुळे आउटिंगला जाताना आणि अर्थातच होळीलादेखील ट्राय करू शकता. सेल्फी लव्हर्ससाठी सगळ्यात महत्त्वाचे, हा कलर कॅमेरा फ्रेंडली आहे. 
  • निऑन कलर तुमचे स्टाइल स्टेटमेंट होऊ शकतो. या नव्या वर्षात हा रंग भाव खाणार यात शंका नाही. तरुणींमध्ये निऑन आणि मुलांच्या ॲक्‍सेसरीजमध्ये फ्लोरोसंट हीट आहे. मुलांच्या पेहरावात जॉमेट्रिक आणि ग्राफिक प्रिंटमध्ये हा रंग उठून दिसतो. 
  • तुम्ही सेलिब्रेटींसारखे लाइव्ह कॉन्सर्ट किंवा एखाद्या नाईट पार्टीला जाणार असाल, तर मुलांनी फ्लोरोसंट आणि मुलींनी निऑन रंगांच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे.  
  • या रंगाबरोबर घालण्यासाठी दुसऱ्या रंगांच्या, जसे की सिल्व्हर व्हाइट, ब्राऊन रंगांच्या ॲक्‍सेसरीज पेअर करू शकता. मात्र, या रंगाबाबत एक निर्णय जरा जरी चुकला तरी तुमचा लुक फसू शकतो. 
  • जिम वेअरमध्ये हा कलर लोकप्रिय असला तरी तुम्ही बेल्ट, बॅग्ज यासारख्या ॲक्‍सेसरीजमध्ये, तसेच भारतीय पेहरावात ट्राय करू शकता. जसे की, एखाद्या पांढऱ्या साडीबरोबर किंवा ब्राईट कलरच्या साडीबरोबर निऑन ब्लाऊज ट्राय करू शकता.
     

संबंधित बातम्या