हॉट सनग्लासेस

समृद्धी धायगुडे
सोमवार, 6 मे 2019

ट्रेंड्‌स
सध्या वाढलेल्या उकाड्याने पेहरावाप्रमाणे ॲक्‍सेसरीजमध्येही बदल करता येतो. घर किंवा ऑफिसमधून बाहेर पडताना डोळ्यांची काळजी घेणे अतिशय आवश्‍यक असते, पण त्याचबरोबर फॅशन मेंटेन करणेदेखील आवश्‍यक असते. या सीझनमध्ये सनग्लासेसच्या डिझाईन्समध्ये आणखी वैविध्य आलेले दिसते. अनेक ऑप्शन्समधून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यानुसार सनग्लासेस निवडावे लागतील. परफेक्‍ट सनग्लासेसची निवड करण्यासाठी ट्रेंड जाणून घेऊ... 

  • गोल चेहऱ्यासाठी पॉइंटेड ग्लासेस, स्क्वेअर ग्लासेस, कॅट आइज फ्रेम, बटरफ्लाय ग्लासेस, ऐव्हिएटर्स अशा स्टाइलचे सनग्लासेस उठून दिसतात. तसेच फ्रेम गडद रंगांची निवडल्यास हटके आणि क्‍लासी लुक मिळतो.  
  • ओव्हल चेहऱ्याच्या लोकांनी जास्त मोठ्या फ्रेमच्या सनग्लासेसची निवड शक्‍यतो टाळावी. यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. असा चेहरा असणाऱ्या व्यक्तींनी रेक्‍टॅंग्युलर, ओव्हल, राउंड, बटरफ्लाय, ऐव्हिएटर्स आणि कॅट आइज अशा फ्रेम्सची निवड करावी. या सनग्लासेस तुम्हाला हॉट लुक देतील. 
  • चेहऱ्याची हार्टशेप ठेवण असल्यास एव्हिएटर किंवा प्लॅस्टिकचे सनग्लासेस ट्राय करावेत. मोठ्या फ्रेम्सचे ग्लासेस शक्‍यतो टाळावेत. चेहरा छोटा आणि फ्रेम्स मोठ्या दिसतात. मोठ्या फ्रेम्स लुक बिघडवू शकतात.
  • चौकोनी चेहऱ्यासाठी मोठी फ्रेम आणि राउंड फ्रेमचे सनग्लासेस छान दिसतात. तसेच कलर्ड फ्रेम ग्लास, फ्रेमलेस ग्लास, कॅट आइज ग्लास याचीही निवड करू शकता. या व्यक्तींनी छोट्या फ्रेम्सची निवड करणे शक्‍यतो टाळावे.
  • समर सीझनसाठी सनग्लासेसच्या शेड्‌स निवडताना गडद रंगांच्या आणि डोळ्याला थंडावा देणाऱ्या निवडाव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्रेंडमध्ये असलेली प्रत्येक शेड आपल्याला शोभून दिसते की नाही, हे तपासून मगच खरेदी करावे.

संबंधित बातम्या