लग्नसोहळ्यासाठी लेहंगा

समृद्धी धायगुडे
सोमवार, 8 जुलै 2019

ट्रेंड्‌स
लग्नासाठी कोणताही ऋतू योग्यच असतो. पण, तुमचा पेहराव कसा असावा हे मात्र ऋतूनुसारच ठरवावे. जर डेस्टिनेशन वेडिंग असेल, तर शक्‍यतो लाइटवेट पेहरावालाच प्राधान्य दिले जाते. नववधूंसाठी ग्लॅमरस लुक देतील असे लेहंग्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ब्रायडल लेहंग्याचा ट्रेंड काय आहे ते बघूया.

 • बाजारात सध्या हलक्‍या फुलक्‍या लेहंग्यामध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे. यातून तुमच्या आवडीचा आणि कंफर्टेबल लेहंगा तुम्ही सहज निवडू शकता.
 • लेहंग्याबरोबर तुम्हाला ओढणीची झंझट नको असल्यास त्यावर तुम्ही लाँग जॅकेट शिवू शकता. 
 • बाजारात सध्या प्रिंटेड लेहंगे आणि त्यावर हलके मिरर वर्क केलेले लेहंगे आलेले आहेत. यातून तुम्ही पारंपरिक लुक मिळवू शकता. 
 • तुम्हाला कूल आणि पूर्णपणे लाइटवेट लेहंगा हवा असेल, तर प्रिंटेड लेहंग्याला प्राधान्य द्यावे.
 • पांढऱ्या थ्रेड वर्क असलेला लेहंगा ट्राय करा. यावर हव्या त्या काँट्रास्ट कलरची ओढणी घेऊन तुमचे सौंदर्य खुलवू शकता.
 • बोल्ड लुकसाठी स्काय ब्ल्यू रंगाचा लेहंगा निवडून त्यावर जरा हटके ब्लाऊज शिवावे.
 • बेबी पिंक रंगात लाइट एम्ब्रॉयडरी असलेले लेहंगेदेखील तुम्ही ट्राय करू शकता. 
 • ग्लॅमरस लुकसाठी फेदर डिटेलिंगचे पिसासारखे हलके लेहंगेदेखील निवडू शकता.
 • मेंदी, संगीत या सारख्या प्रसंगांना तुम्ही प्रिंटेड स्कर्ट स्टाइल लेहंगा आणि त्यावर डीप क्‍लिवरेज ब्लाऊज ट्राय करा. 
 • टुले फॅब्रिकचा फ्लोरल प्रिंटेड लेहंगा, हलकी एम्ब्रॉयडरी असलेला लेहंगा हेदेखील उत्तम पर्याय आहेत. 
 • बनारसी साडीप्रमाणे बनारसी प्रिंटेड लेहंगा किंवा प्लेन लेहंग्यावर फुलकारी दुपट्टा आणि स्ट्रिप ब्लाऊज हा एक पेहराव ट्राय करू शकता. 
 • असे विविध प्रकारचे लेहंगा कलेक्‍शन बाजारात आले असून ब्रायडल, करवल्या सगळ्यांसाठीच पर्याय उपलब्ध आहेत. फक्त त्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे आणि प्रसंगानुरूप दागिने आणि इतर ॲक्‍सेसरीज निवडून आपले सौंदर्य खुलवा.

संबंधित बातम्या