फिटनेस आणि फॅशन

समृद्धी धायगुडे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

ट्रेंड्‌स
ज्या व्यक्ती फिटनेस फ्रिक असतात आणि जिममध्ये जाऊन सुंदर सुबक बांध्यासाठी प्रयत्नशील असतात, त्या व्यक्ती फॅशनदेखील फॉलो करत असतात. त्यांच्यासाठी खास स्पोर्ट्‌स फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर बरेच सेलििब्रटी आपले जिमलूक आणि वर्कआउटचे व्हिडिओ पोस्ट करतात. तरुणांमध्ये ही फॅशन ट्रेंडमध्ये आहे. हे आउटफिट्‌स तुम्ही जिमशिवाय इतर वेळीही वापरू शकता.

  • हॉट शॉर्ट्‌स : जिममध्ये जाताना थोड्या हटक्‍या आणि हॉट फॅशनसाठी या शॉर्ट्‌सना प्राधान्य देऊ शकता. यातील कलर कॉम्बिनेशन तुम्ही इतर कॅज्युअल वेअरबरोबरदेखील ट्राय करू शकता.
  • एव्हरग्रीन ब्लॅक : काळा रंग बोरिंग नाही. हा रंग जिमवेअरमध्ये आणि इतर प्रकारातही तेवढाच लोकप्रिय आहे. काळ्या रंगाच्या कपड्यांचा एक फायदा, म्हणजे तुम्ही त्यात स्लिम दिसता.
  • फ्युजनची फॅशन : जिमचे टीशर्ट्‌स आणि वेस्टर्न जॅकेट जीन्सवर सहज घालू शकता. हे फ्युजन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी उठावदार लुक देते.
  • हुडीज : जिम वेअरमधील हुडी सर्वांत उत्तम पर्याय आहे. या हुडीज तुम्ही कॅज्युअल ड्रेसबरोबरही घालून स्टाइल मारू शकता.
  • लाँग लेग ब्युटी : जिमच्या लेगिन्स जिम व्यतिरिक्त ही परिधान केल्यास चांगल्या दिसतात. यामध्ये तुम्ही खूप स्लिम तर दिसताच, पण स्टाइलदेखील मेंटेन केली जाते. यामध्ये हाफ डिझाईन केलेल्या, हाफ प्लेन, हाफ लेस असलेल्या अशी व्हरायटी दिसते. 

संबंधित बातम्या