ज्युनिअर फॅशन फॉलोअर

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

ट्रेंड्‌स

फॅशनेबल ॲक्‍सेसरीज, कपडे, वस्तू वापरणे हे फक्त मोठ्यांसाठी नसते तर लहान मुलांसाठीसुद्धा फॅशनेबल ॲक्‍सेसरीज असतात. लहान बाळाच्या डायपरपासून ते पायातील इवल्याशा बुटांपर्यंत सर्व वस्तूंमध्ये फॅशन उपलब्ध आहे. निरागसतेसोबत फॅशनेबल कपडे निश्‍चितच खुलून दिसतात. लहान मुलांच्या फॅशनविषयी...

 • लहान मुलांना कलरफुल कपडे, फरचे कोट्‌स, जॅकेट्‌स, वेलवेटचे टॉप, जॅकेट्‌स, वनपीस, फ्रॉक असे कपडे उठून दिसतात. 
 • पादत्राणांमध्ये फ्लोरल फूटवेअर उत्तम पर्याय असतो. प्रत्येक रंगाचे शूज, ब्लेरिनाज मुलींना शोभून दिसतात. 
 • या सिजनमध्ये लहान मुलांच्या वॉर्डरोबमध्ये वेलवेट आणि फरचे कोट निश्‍चितच दिसतात. फर कोट हे प्राथमिक पेहराववर उठून दिसतात. 
 • लहान मुलांच्या पार्टीवेअर ड्रेसमध्ये चमचम करणारे ड्रेस त्यावर वेलवेट किंवा कॉड्राचे जॅकेटदेखील छान दिसते. 
 • तुमच्या लहान मुलाला किंवा मुलीला कलरफुल आणि स्टायलिश कपड्यांनी परफेक्‍ट लुक द्यावा. 
 • या सिजनमध्ये सध्या फेदर ॲक्‍सेसरीजची प्रचंड चलती आहे. फ्लोरल हेअर बॅण्ड, ग्लॉसी हेअरटाय, बो, टायपिन, क्‍लिप्सनी तुम्ही आपल्या मुलांचा लुक मस्त करू शकता. 
 • सध्या बाजारात मुलांसाठी हॅट, विंटर कॅप्समध्ये प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. मोठ्यांसाठी जितकी व्हरायटी नसेल इतकी लहान मुलांसाठी उपलब्ध  असते. मंकी कॅप, पांडा कॅप, गॉगल कॅप, काश्‍मीर स्टाइल, दोन वेण्या असलेली कॅप तर लहान मुलींना खूपच गोड दिसते.
 • सध्या सोशल मीडियावर सेलेब्रटींच्या मुलांसारखे कपडे खरेदी करण्याची क्रेझ देखील खूप वाढली आहे. विशेषतः: चार वर्षांच्या मुली आराध्या बच्चनला फॉलो करतात. 
 • ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटमध्ये लहान मुलांसाठी कपड्यांची, ॲक्‍सेसरीजची प्रचंड व्हरायटी पाहायला मिळते. काही संकेतस्थळे खास मुलींच्याच कपड्यांची विक्री करतात. या संकेतस्थळांवर गेल्यास आपल्या मुलाचे-मुलीचे योग्य वय आणि माप दिल्यास त्वरित तो ड्रेस घरपोच मागविता येतो.
 • ड्रेसवर कानातले स्टड, शोभेल असे पेंडंटचा सेट घालावा. हातामध्ये मिक्‍स ॲण्ड मॅच बांगड्या किंवा ब्रेसलेट घालावे. 
 • जोडी तुझी माझी ः हल्ली सोशल मीडिया आणि ऑनलाइन साइट्‌सवर आई आणि मुलीचे सारख्या रंगांचे, पॅटर्नचे, फॅशनचे ड्रेस उपलब्ध आहेत. यासारखेच वडील-मुलासाठी देखील उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार आणि समारंभानुसार त्या डिझायनर वेअरची निवड केल्यास बाप-लेकाची, मायलेकींची जोडी चारचौघात नक्की भाव खाऊन जाईल.
   

फोटो फीचर

संबंधित बातम्या