लोकरीची ज्वेलरी

समृद्धी धायगुडे 
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

ट्रेंड्‌स
ज्वेलरीमध्ये रोज नवीन प्रकार येतात. याच प्रकारात आणखी एका प्रकाराचा भर पडली आहे ती म्हणजे लोकरीची ज्वेलरी. याविषयी... 

ज्वेलरीमध्ये रोज नवीन प्रकार येतात. वेगवेगळ्या मटेरिअलपासून बनलेली ज्वेलरी आपण वापरतो. सध्या याच प्रकारात आणखी एका प्रकाराचा भर पडली आहे ती म्हणजे क्रोशाची म्हणजेच लोकरीची ज्वेलरी. याविषयी... 

  • लोकरीचे स्वेटर,शाली, जॅकेट्‌स मफलर असे प्रकार आपण वापरतोच,पण काही कल्पक ज्वेलरी डिझायनर्सनी लोकरीपासून आकर्षक अशी ज्वेलरी बनवलेली दिसते.
  •  कलरफुल लोकर वेगवेगवेळ्या आकारात विणून हे दागिने तयार केले जातात. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक रंगाच्या पोशाखावर ही ज्वेलरी सहज मॅच होते. 
  • लोकरीच्या अंगठ्या, ब्रेसलेट, गळ्यातील, कानातली, नेकपीस, झुबे, मोठी गळ्यातील असे विविध प्रकार या ज्वेलरीमध्ये दिसतात.
  • गळ्यातल्यांमध्ये नाजूक फुलांच्या डिझाईनपासून, वेलीसारखी गळ्यातील, चोकर, सिंगल पेंडंट असलेली, चार पदरी, पाच पदरी, या सारखे गळ्यातले दागिने तरुणींना भावतात.  
  • या क्रोशाच्या ज्वेलरीमध्ये आवडीनुसार रंगबिरंगी बटणे, मोती यांचा वापर केला जातो.
  • तुम्हाला सुद्धा लोकरीचे विणकाम येत असेल तर युट्युबवर याचे व्हिडिओ बघू शकता. 
  • ही ज्वेलरी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट, सोशल मीडिया ग्रुप्सवर सहज मिळते. 
  • या ज्वेलरीचा एक सेट किमान 
  • १५०-२०० रुपयांपासून उपलब्ध आहे. 
  • या कडाक्‍याच्या थंडीत तुमची अनोखी स्टाइल दाखविण्यासाठी ही ज्वेलरी नक्की ट्राय करावी.

फोटो फीचर

संबंधित बातम्या