व्यायामशाळेला जाताना

समृद्धी धायगुडे 
गुरुवार, 8 मार्च 2018

ट्रेंड्‌स

जिममध्ये जाण्यासाठी वेगळा पेहराव लागतो. हा खरेदी करण्यासाठी काही टिप्स...

जिम आऊटफिट निवडताना सध्या हिवाळा सुरू असल्याने बहुतेक तरुणांना व्यायामासाठी उत्साह आला असेल. शहरातील छोट्या-मोठ्या जिमपासून सगळीकडे तरुण-तरुणी गर्दी करताना दिसतात. हा उत्साह भले महिनाभर असेल पण तयारी मात्र सगळी परफेक्‍ट असली पाहिजे. दरवेळी शॉपिंगला गेले की, पार्टीवेअर,कॅज्युअल वेअरची मोठ्या उत्साहात खरेदी होते. जिममध्ये जाण्यासाठी वेगळा पेहराव लागतो. हा खरेदी करण्यासाठी काही टिप्स...

व्यायाम करताना प्रचंड घाम येत असतो, त्यामुळे जिमला जाताना घाम शोषणारे कपडे घालणे गरजेचे असते. सध्या बाजारात सुती,लायक्रा यासारख्या फॅब्रिकचे स्पोर्टस वेअर उपलब्ध आहेत. यातील आपल्या आवडीनुसार योग्य फॅब्रिक तुम्ही निवडू शकता.

पोशाखासोबतच बॅगदेखील आवश्‍यक तुमच्या बॅगेत कपड्यांसोबत पाण्याची बाटली, एक टॉवेल, ग्लुकोज, डिओड्रंट, शूज सारख्या गोष्टी न चुकता ठेवाव्यात.

योग्य पादत्राणे
जिमला जाताना जितका पोशाख महत्त्वाचा असतो. तितकीच पादत्राणांची निवड गरजेची असते. चांगल्या ब्रॅण्डची टिकाऊ पादत्राणे व्यायाम करताना घातल्यास व्यायाम करताना होणारी दुखापत काही प्रमाणात टळते. तसेच पायांवर ताण येत नाही आणि चपळ हालचाली करणे सोपे जाते.

कपड्यांचे फिटिंग
तुम्ही ज्या प्रकारचा व्यायाम करता त्यानुसार फिटिंगच कपडे घालणे आवश्‍यक असते. जर जास्त ताकदीचा व्यायाम असेल तर थोडे सैल, कमी उंचीचे कपडे घालावेत. योगासनांसारख्या व्यायामासाठी स्ट्रेचेबल आणि फिट पोशाख निवडावा.

फोटो फीचर

संबंधित बातम्या