फॅशन फॉलो करताना...

समृद्धी धायगुडे
शुक्रवार, 9 मार्च 2018

ट्रेंड्‌स

सध्या विविध हॉलिवूड-बॉलिवूड स्टारची फॅशनची नक्कल करण्याच्या नादात बरेच जण काही चुका करून बसतात या चुका या कशा टाळाव्यात याच्या टिप्स...

फॅशन फॉलो करणे हे चूक नाही. मात्र फॅशन फॉलो करताना काही चुका झाल्या तर तुमचा लुक बिघडू शकतो. सध्या विविध हॉलिवूड-बॉलिवूड स्टारची फॅशनची नक्कल करण्याच्या नादात बरेच जण काही चुका करून बसतात या चुका या कशा टाळाव्यात याच्या टिप्स...

     ज्वेलरीविषयी सांगायचे झाले तर बहुतेक सर्व महिला हेवी वर्क असलेल्या पेहरावासोबत हेवी ज्वेलरी घालायलाच प्राधान्य देतात. हे अतिशय वाईट दिसते. अशा चुका टाळाव्यात. चेहऱ्याच्या आकारानुसार ज्वेलरी निवडावी. जर तुम्ही हेवी वर्क असलेला पेहराव करणारा असाल तर ज्वेलरी फारशी घालू नये. बटबटीत ज्वेलरीपेक्षा एक नेकलेस आणि मोठे कानातले घालू शकता. हे कानातले घालण्यापूर्वी चेहऱ्याला शोभून दिसतात हे पाहावे. चेहऱ्यापेक्षा मोठे कानातले घालायला जाऊ नका, यामुळे लुक खराब होतो. यासोबतच केशरचना आणि मेकअपचा देखील विचार करा. कोणतीही केशरचना किंवा मेकअप पद्धती निवडावी, परंतु ती तुमच्या शारीरिक ठेवणीला आणि चेहऱ्याला शोभेल याचा आधी अंदाज घ्यावा.

     बहुतेक मुलींना फिटिंगचे कपडे घालायची सवय असते. अशा प्रकारचे कपडे सतत घातल्याने यातून कम्फर्ट मिळत नाही. जर तुमची अंगकाठी थोडी जाड असेल, तर मात्र हे कपडे अजिबातच सूट होत नाही. खूप तंग कपडे घालून स्वतः सारखे अस्वस्थ राहायचे याला काही अर्थ नसतो. पेहराव करताना या चुका टाळाव्यात.

     सध्या ओव्हर साईज बॅग ट्रेडमध्ये आहे,पण ही सगळ्याच पेहरावावर शोभून दिसत नाही. या बॅगमध्ये सामान निश्‍चितच जास्त मावते, पण हे सामान भरल्यानंतर ही बॅग कशी दिसते हे तुम्ही नीट पाहिले आहे का? या बॅगेत सामान भरल्यानंतर ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसते का? हे एकदा आरशात पाहावे. ओव्हर साईज बॅग ही पार्टी वेअर ड्रेसवर घेणे टाळावे, यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. 

     पादत्राणे निवडतानादेखील आपण अशा चुका करतो. विशेषतः उंच टाचेची पादत्राणे निवडताना या चुका होतात. पादत्राणांचा शरीरावर वाईट प्रभाव पडतो. मुलांच्या पायांच्या चवड्‌यांवर दबाव येतो. यामुळे कंबर बाहेरच्या बाजूला वाकते. तज्ञांनीदेखील या प्रकारच्या पादत्राणांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. उंच टाचांमुळे आपण समतोल साधू शकत नाही. दैनंदिन वापरामुळे कंबरेचे आजार उद्भवतात.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या