शानदार इयरफोन्स 

ज्योती बागल
बुधवार, 6 मे 2020

व्हॉट्‌स न्यू
हल्ली मोबाइल फोन्स, हेडफोन्स, इयरफोन्स, इयरबड्स यामध्ये असंख्य डिझाइन्स बघायला मिळतात. मात्र युजर्ससाठी महत्त्वाचे असतात, ते  त्या गॅजेट्समध्ये उपलब्ध असलेले फीचर्स! अशाच अनेक नव्या फीचर्ससह बाजारात दाखल झालेल्या इयरफोन्सची थोडक्यात माहिती...  

बुलेट वायरलेस झेड  इयरफोन   
वन प्लस  या कंपनीने  ८ सीरिजबरोबर बुलेट वायरलेस  झेड  इयरफोन  (OnePlus Bullets Wireless Z)  लाँच  केला आहे. या  इयरफोनमध्ये मॅग्नेटिक कंट्रोल आणि क्विक पेअरिंगसारखे फीचर्स दिले असल्याने युजर्स हे  इयरफोन्स सहज वापरू शकतात. हे  इयरफोन भारतातही लवकरच  लाँच  होतील. कंपनीने वनप्लस बुलेट वायरलेस  झेड इयरफोनची किंमत  ४९ डॉलर एवढी ठेवली आहे. म्हणजे ३,८०० रुपये. भारतात मात्र या इयरफोन्सची किंमत चार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. विशेष बाब म्हणजे फक्त १० मिनिटांच्या  चार्जिंगमध्ये १० तासांचा  बॅटरी बॅकअप मिळतो.  तर,  फुल चार्जिंगमध्ये युजर्सना २० तासांचा  बॅटरी बॅकअप मिळतो. यामध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले असल्याने चार्जिंग फास्ट व्हायला सपोर्ट मिळतो. या इयरफोन्सना  आईपी  ५५ ची रेटिंग मिळाली आहे. म्हणजे यावर पाण्याचे थेंब पडले तरीही हा खराब होणार नाही. फास्ट कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट देण्यात आला आहे. 

‘ऑडिओ टेक्निका’चे  ब्लूटूथ नेकबँड    
जपानच्या  ऑडिओ टेक्निका  कंपनीने काही दिवसांपूर्वीच  ब्लूटूथ नेकबँड  ATH-CLR100BT लाँच केला आहे. या  वायरलेस  इयरफोनची किंमत २,४९९ रुपये एवढी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या इयरफोन्सची ऑडिओ क्वालिटी उत्तम दर्जाची आहे. हे  नेकबँड ब्लॅक, ब्ल्यू, रेड आणि व्हाइट  कलरमध्ये  उपलब्ध आहेत. सिंगल चार्जिंगमध्ये याची बॅटरी सात तासांचा  बॅटरी बॅकअप देते. या  इयरफोनमध्ये मायक्रो फोन  दिला आहे. याचे वजन १७ ग्रॅम एवढे आहे. खास गोष्ट म्हणजे या  इयरफोनबरोबर तीन इयरबड्सही दिले जातात. जे  स्मॉल, मिडीयम आणि लार्ज अशा तीन  साइजमध्ये येतात. तर कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ 5.0 चा  सपोर्ट दिला आहे. तसेच यामध्ये मॅग्नेटचा वापर केला असल्याने वापरणे सोयीचे जाते. म्हणजे गरज नसेल तेव्हा हे  एकमेकांना चिटकून बसतात. यांची डिझाइनही छान आहे. ऑडिओ क्वालिटीमुळे हे  इयरफोन्स युजर्सना नक्कीच आवडतील.

‘शाओमी’रचे लेटेस्ट  इयरफोन्स 
चीनची प्रसिद्ध कंपनी शाओमी(Xiaomi)ने नुकतेच लाइन फ्री हेडफोन आणि  ब्लूटूथ यूथ एडिशन इयरफोन  लाँच  केले आहेत. या दोन्ही इयरफोनमध्ये युजर्सना उत्तम प्रकारची ऑडिओ क्वालिटी आणि बॅटरी बॅकअप मिळतो आहे. तसेच या दोन्ही इयरफोन्समध्ये आणखी बरेच फीचर्स दिले आहेत. मात्र, हे  इयरफोन  भारतात अजून लाँच  झालेले नाहीत. यामध्ये ब्लॅक आणि व्हाइट  या  दोन रंगांचे  पर्याय उपलब्ध आहेत. हे  इयरफोन शाओमीच्या अधिकृत वेबसाइटवरून  खरेदी करता येऊ शकतात. शाओमीनेदेखील आपल्या इयरफोन्समध्ये  कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 चा  सपोर्ट दिला आहे. शिवाय मॅग्नेटिक इयरबड्सही दिले आहेत. याचबरोबर साउंड  क्वालिटीही उत्तम असून त्यासाठी QCC5125 ऑडिओ चिपसेटबरोबर डीएसपी+सीव्हीसी टेक्निक  दिली आहे. यांची बॅटरी साधारण चार तासांचा  बॅटरी बॅकअप देत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या