स्टायलिश स्टडी टेबल लॅंप्स 

ज्योती बागल
सोमवार, 2 मार्च 2020

व्हॉट्‌स न्यू
अभ्यास असो किंवा ऑफिसमधला एखादा प्रोजेक्ट. जेव्हा लिंक लागेल, तेव्हा ते पूर्ण करायला बसायचे. अशावेळी खोलीतले मोठे लाइट लावून सर्वांना डिस्टर्ब न करता आपल्यापुरताच असणारा टेबल लॅंप केव्हाही फायदेशीरच. अशाच काही लॅंप्सविषयी...

स्मार्ट वन रॉक लाइट एलईडी स्टडी टेबल लॅंप 
हा स्मार्ट लॅंप असल्याने टच सेन्सरसह फोल्डेबल स्वरूपात येतो. यामध्ये तीन प्रकारचे लाइट मोड असून आपल्या गरजेनुसार आपल्याला हवा तो लाइट मोड अॅडजस्ट करू शकतो. हा लॅंप पोर्टेबल असून यामध्ये एलईडी बल्ब वापरला आहे. याचा उपयोग स्टडी डेस्क आणि बेडसाइडसाठीही होतो. यामध्ये इनबिल्ट रिचार्जेबल बॅटरीदेखील आहे, जी बराच काळ टिकते. हा लॅंप पांढऱ्या रंगात उपलब्ध असून याची क्लासिक, पण सिंपल डिझाईन सर्वांना आकर्षित करते. तसेच हा कमी वजनाचा असून यासाठी जागाही खूप कमी लागते. महत्त्वाचे म्हणजे याच्या प्रकाशाने डोळ्यांना त्रास होत नाही. हा लॅंप टिकाऊ आणि आकर्षक असल्याने याला चांगली मागणी दिसते. 

सनसेन्सेस स्टडी टेबल लॅंप 
हा लॅंप सिंपल स्वरूपात असून विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स यांच्यासाठी चांगला पर्याय आहे. या लॅंपला मेटलची फिनिशिंग दिसते. मात्र या लॅंपसह बल्ब दिला जात नाही, तो स्वतंत्र घ्यावा लागतो. या लॅंपमध्ये एलईडी किंवा सीएफएलपैकी कोणताही बल्ब वापरता येतो. ब्लॅक मेटल बॉडी आणि ग्लॉसी डिझाईनमुळे हा लॅंप जास्त आकर्षक दिसतो. याचे साधारण वजन १.४ किलो आहे. लॅंप थोडा उंच आहे, मात्र आपल्या गरजेनुसार उंची अॅडजस्ट करता येते. याची क्वालिटी उत्तम असून याचे स्टॅंडही मजबूत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा प्रत्येक भाग दुरुस्त करता येतो आणि बदलताही येतो.

हेलिकॉन टेबल लॅंप
हा एक आधुनिक प्रकारचा डेस्क लॅंप आहे, जो स्टडी रूम, ऑफिस अशा ठिकाणी वापरता येतो. यामध्ये बी २२ एलईडी बल्ब वापरला आहे. हा लॅंप पूर्णपणे रोटेट करता येत असल्याने आपल्या सोयीनुसार अॅडजस्ट करता येतो. तसेच याची उंचीही अॅडजस्ट करता येते. त्यामुळे डोळ्यांनाही प्रकाशाचा त्रास होत नाही. मात्र, हा लॅंप रिचार्जेबल नाही. स्टील आणि सिंथेटिकपासून हा लॅंप तयार केला असल्याने मजबूत आणि टिकाऊ आहे. हा सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे.

विप्रो गार्नेट एलईडी टेबल लॅंप 
या लॅंपचा साईज अतिशय काँपॅक्ट असून डिझाईनही अतिशय इनोव्हेटिव्ह आहे. यामध्ये तीन प्रकारचे लाइट मोड असून त्याची चेंजिंग सिस्टीमही दिलेली आहे. यामध्येही एलईडी बल्ब वापरला असून यासाठी ६ वॅट एवढी ऊर्जा लागते. या लॅंपला टच स्विचची उत्कृष्ट सिस्टीम दिलेली आहे. लॅंप एबीएस मटेरियलपासून तयार केला असून तो वजनाने हलका आहे आणि कुठेही सहज नेता येऊ शकतो.

महर्ष एंटरप्राइझ एलईडी स्टडी टेबल लॅंप 
या लॅंपमध्ये थ्री-स्पीड टच कंट्रोल सिस्टीम उपलब्ध असून हा खास स्टडी टेबल लॅंप असला तरीही याचा वापर डायनिंग टेबल, ऑफिस किंवा घरातील इतर ठिकाणीही करता येतो. काँप्युटर आणि मोबाइलच्या मदतीनेही याला चार्ज करता येते. याचा ब्राईटनेस योग्य प्रमाणात असल्याने डोळ्यांना त्रास होत नाही. या लॅंपचे वजन १७० ग्रॅम असून यामध्ये ३००० एमएएच बॅटरी वापरली आहे. याच्या चार्जिंगला ८ ते १० तासांचा वेळ लागतो. शिवाय बॅटरी फार काळ टिकत नसल्याचे बोलले जाते. मात्र, या लॅंपच्या आकारामुळे आणि डिझाईनमुळे हा वापरण्यास योग्य आणि सोयीचा पडतो.  

या सर्व लॅंप्सच्या किमती साधारण एक हजार ते दीड हजारच्या दरम्यान असून हे सर्व लॅंप्स ऑनलाइन उपलब्ध आहेत.
 

संबंधित बातम्या