वायरलेस नेकबँड, इअरफोन!

ज्योती बागल 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

कॉम्पॅक्ट डिझाइन असलेल्या वायरलेस नेकबँड, इअरफोन्सना तरुणांकडून सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक मोबाइल कंपन्या आकर्षक स्वरूपात, उत्तम फीचर्स असलेले इअरफोन्स सतत बाजारात आणत असतात. नुकत्याच बाजारात दाखल झालेल्या इअरफोन्सविषयी... 

रॉयल्टी नेकबँड : गॅजेट ॲक्सेसरीज आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड U&i या भारतातील प्रसिद्ध कंपनीने एक नवीन नेकबँड लाँच केला आहे. या नेकबँडला UiNB-4023 रॉयल्टी असे नाव देण्यात आले आहे. या वायरलेस नेकबँडमध्ये 260mAh क्षमता असलेल्या बॅटरीचा वापर केला आहे. साधारण २३ तास ही बॅटरी पुरते. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी तीन तास लागतात. हा रॉयल्टी नेकबँड मल्टी फंक्शनल आहे. तसेच यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोन, गुगल आणि सिरी असिस्टंटचा सपोर्टही दिला आहे. रॉयल्टी नेकबँडचे फीचर्स बघितले तर यामध्ये 5.0 ब्लूटूथ, २३ तासांचा प्लेटाइम, स्टॅण्डबाय टाइम जवळपास ६०० तास, कव्हरेज एरिया १० मीटर इत्यादी गोष्टी आहेत. याची किंमत २,९९९ रुपये एवढी आहे. 

बीट ब्रदर्स नेकबँड सीएल - 130 : इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाइल ॲक्सेसरीज ब्रँड विंगाजॉय (VingaJoy) या भारतीय कंपनीनेही नुकताच एक वायरलेस नेकबँड लाँच केला आहे. या नेकबँडला ‘बीट ब्रदर्स नेकबँड सीएल - 130’ असे नाव दिले आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा नेकबँड एकदा चार्ज केला, की सलग १२ तास म्युझिक ऐकता येते. बीट ब्रदर्स नेकबँड सीएल - 130 चे डिझाइन अतिशय कॉम्पॅक्ट असून याची किंमत १,३९९ रुपये एवढी आहे. या नेकबँडच्या बड्समध्ये मॅग्नेटचा सपोर्ट दिला आहे. शिवाय यामध्ये नॉईज कॅन्सलेशनचे फीचरही दिले आहे. 

टेक्नो Hipods H2 TWS : ‘टेक्नो’ने भारतात त्यांचा पहिला वायरलेस इअरफोन Hipods H2 लाँच केला आहे. या इअरफोनची खासियत म्हणजे यामध्ये एन्व्हायर्न्मेंट नॉईज कॅन्सलेशन फीचर दिले आहे. शिवाय यामध्ये २४ तासांचा बॅटरी बॅकअप दिला आहे. टेक्नो Hipods H2 मध्ये कॉलिंग आणि म्युझिक कंट्रोलसाठी टचचा सपोर्ट दिला आहे. तसेच उत्तम साउंड क्वालिटीसाठी ॲडव्हान्स्ड ऑडिओ कोडिंग (AAC) टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये 45mAh क्षमता असलेली बॅटरी दिली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या इअरफोन्सना दोन तासांचा बॅकअप मिळतो. यामध्ये ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट दिला आहे. या इअरफोनची विक्री लवकरच सुरू होईल. हे इअरफोन्स ब्लॅक आणि व्हाइट रंगात उपलब्ध आहेत. टेक्नोच्या या इअरफोनची स्पर्धा एम्ब्रेन (Ambrane) च्या नव्या वायरलेस इअरबड्स बास ट्विन (Bass Twins) होऊ शकते. बास ट्विन इअरबड्सची किंमत १,९९९ रुपये असून यामध्ये व्हॉइस असिस्टंटचा सपोर्टही दिला आहे. 

संबंधित बातम्या