बेल्किनचे युनिक चार्जिंग पॅड 

ज्योती बागल
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

व्हॉट्‌स न्यू

बेल्किन (Belkin) या अमेरिकन कंपनीने काही दिवसांपूर्वी एक वायरलेस चार्जिंग पॅड लाँच केले आहे. ‘काकाओ बूस्टअप 10W वायरलेस चार्जिंग पॅड’ (Kakao BOOSTUP 10W Wireless Charging Pad) असे या चार्जिंग पॅडचे नाव आहे. या चार्जिंग पॅडबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...  

बेल्किनच्या या चार्जिंग पॅडसाठी काकाओ फ्रेंड्स कॅरॅक्टर Ryan आणि Apeach बरोबर भागीदारी केली आहे. काकाओ एडिशनचे हे चार्जर पॅड दोन रंगात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रायन ब्लॅक आणि एपीच व्हाइटचा समावेश आहे. रायन ब्लॅक चार्जिंग पॅडबद्दल बोलायचे झाले, तर या चार्जिंग पॅडला स्टॅंडर्ड आयक्यू सर्टिफिकेशन दिले आहे. या चार्जरने युजर्स आयफोन आणि सॅमसंगच्या त्याच मोबाइल फोन्सना चार्ज करू शकणार आहेत, ज्यामध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असेल. यामध्ये 10W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला असल्याने चार्जिंग पटकन होते. तसेच या चार्जर पॅडमध्ये एक एलईडी इंडिकेटर दिला आहे, जो चार्जिंगच्या स्टॅबिलिटीबद्दल माहिती देतो. 
काकाओच्या या चार्जर पॅडची किंमत ३,४९९ रुपये आहे, तर यावर दोन वर्षांची वॉरंटीदेखील दिली जात आहे. या चार्जरने युजर्स आयफोन आणि सॅमसंगच्या त्याच मोबाइल फोन्सना चार्ज करू शकणार आहेत, ज्यामध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट असेल. यामध्ये 10W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला असल्याने चार्जिंग पटकन होते. तसेच या चार्जर पॅडमध्ये एक एलईडी इंडिकेटर दिला आहे, जो चार्जिंगच्या स्टॅबिलिटीबद्दल माहिती देतो. 
या चार्जिंग पॅडवर काकाओ फ्रेंड्सचा लोगो दिला असून त्यावर चार्जिंग साइनबरोबर टाइम टू फील लिहिले आहे. या पॅडच्या कडेला रबरी पट्टी बसवल्याने ग्रिपिंगसाठी मदत होते आणि चार्जिंगसाठी लावलेला फोन किंवा इतर डिव्हाइसेस घसरून पडण्याचा धोका नाही. तसेच पॅडच्या खालील बाजूसही ग्रिपिंग्सचा सपोर्ट दिला आहे, त्यामुळे चार्जर पॅड एका ठिकाणाहून अजिबात सरकत नाही.  
या चार्जिंग पॅडला मायक्रो यूएसबी पोर्ट दिले आहे. याला दिलेल्या एलईडी इंडिकेटरचा लाइट पॉवर सप्लाय होऊन डिव्हाइस कनेक्ट झाल्यावर सुरू होतो. जोपर्यंत फोन किंवा इतर डिव्हाइस चार्जिंगला लावलेले असेल, तोपर्यंत त्याचा लाइट सुरू राहतो. ‘रिअलमी’नेदेखील काही दिवसांपूर्वी असाच एक वायरलेस चार्जर लाँच केला होता. त्याची किंमत फक्त ८९९ रुपये एवढी आहे. त्या तुलनेने बेल्किनच्या चार्जरची किंमत थोडी जास्त वाटते. मात्र या चार्जरचे युनिक डिझाइन ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल हे नक्की.

संबंधित बातम्या