ट्रेंडी लॅपटॉप्स 

ज्योती बागल 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना आता फक्त आयटी क्षेत्रापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करावे लागत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांत कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, टॅब्ज यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. बाजारात दाखल झालेल्या नवीन लॅपटॉप्सविषयी थोडक्यात...  

डेल कंपनीने त्यांचा सर्वात खास Dell XPS 17 प्रीमिअम लॅपटॉप नुकताच भारतात लाँच केला आहे. या लॅपटॉपमध्ये 10th जनरेशनच्या इंटेल कोअर i7 ७ सीपीयू, 8GB रॅम Nvidia GeForce GTX 1650 Ti आणि 512GB एसएसडीचा सपोर्ट दिला आहे. या लॅपटॉपमध्ये १७ इंचांचा फुल एचडी प्लस अँटी ग्लेअर डिस्प्ले आहे. याचे रेझोल्युशन 1920 x 1200 पिक्सल एवढे आहे. लॅपटॉपची किंमत २,०९,५०० रुपये आहे. यामध्ये 97Wh ची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय 6 AX1650 (2 x 2), ब्ल्यूटूथ व्हर्जन 5.1, चार थंडरबोल्ट, ३ पोर्ट, एक फुल साईज एसडी कार्ड रीडर आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे फिचर्सही दिले आहेत. हा लॅपटॉप २.१ किलोग्रॅम वजनाचा आहे. 
याआधी डेलने ‘Dell XPS 14’ आणि ‘Dell XPS 15’ हे दोन लॅपटॉप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणले होते. 

लिनोव्हो कंपनीने मागच्याच आठवड्यात तीन प्रीमिअम गेमिंग लॅपटप्स लाँच केले आहेत. यामध्ये Legion 7i, Legion 5Pi आणि Legion 5i यांचा समावेश आहे. हे लॅपटॉप्स अनुक्रमे स्लेट ग्रे, आयर्न ग्रे आणि फँटम ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. चांगल्या परफॉर्मन्ससाठी यामध्ये 10th जनरेशन इंटेल कोअर i9 प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. यांच्या किमती अनुक्रमे १,९९,९९० रुपये, १,३४,९९० रुपये आणि ७९,९९० रुपये अशा आहेत. यामध्ये Legion 7i हा हाय परफॉर्मन्स आणि प्रीमिअम स्टाइलचा गेमिंग लॅपटॉप आहे. याचे वजन फक्त २.२ किलोग्रॅम आहे. 

याशिवाय लिनोव्होने ‘Lenovo Yoga Slim 7i’ लॅपटॉप लाँच केला आहे. यामध्येदेखील 10th जनरेशनच्या इंटेल कोअर i7 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे, तर 60Wh ची बॅटरी दिली आहे. या लॅपटॉपची स्क्रीन १८० डिग्रीमध्ये उघडता येऊ शकते. तसेच यामध्ये इंटेलिजंट कुलिंग हे फिचरही देण्यात आले आहे. या लॅपटॉपची किंमत ७९,९९० रुपये एवढी आहे. या लॅपटॉपला फुल एचडी आयपीएस डिस्प्ले दिला असून याचे रेझोल्युशन 1920 x 1080 पिक्सल आहे. ग्राफिक्ससाठी यामध्ये Nvidia GeForce MX350 GDDR5 दिले आहे, जे साधारण 2GB चे आहे. तसेच यामध्ये 16GB रॅम 512GB एमएसडी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 2X2 AX Wi-Fi 6 आणि Thunderbolt 3 दिले आहे. या लॅपटॉपचे वजन १.३ किलोग्रॅम एवढे आहे. 

वरील सर्व लॅपटॉप्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइट्सवर तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या साइट्सवरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या