अमेझिंग स्पीकर्स 

ज्योती बागल 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

अलीकडच्या काही वर्षांत वायरलेस आणि ब्ल्यूटूथ स्पीकर्सची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठ्या कंपन्यांचे स्पीकर्स आपल्याला बाजारात पाहायला मिळत आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या अशाच स्पीकर्सविषयी थोडक्यात...     

भारतातील प्रमुख कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स ॲक्सेसरी ब्रँड ‘यूबॉन’ (UBON)ने ‘एसपी-43 लाइट अप’ वायरलेस स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरची खासियत म्हणजे, तुम्ही नॉनस्टॉप १० तास म्युझिकचा आनंद घेऊ शकता. कंपनीने या स्पीकरच्या बॅटरीसंदर्भात केलेल्या दाव्यानुसार, १० तासांचा बॅटरी बॅकअप आहे. यूबॉनच्या या स्पीकरमध्ये 1200 MaH रिचार्जेबल बॅटरी आहे. याशिवाय या स्पीकरमध्ये टीएफ-कार्ड, एफएम आणि यूएसबी पोर्ट सपोर्ट दिला आहे. तसेच यामध्ये ब्ल्यूटूथ 5.0 असून त्याची रेंज १० मीटरपर्यंत आहे.  

‘यूबॉन’च्या ‘एसपी-43 लाइट अप’ स्पीकरमध्ये डबल एलईडी आरजीबी लाईटचा बेल्ट दिला असून या स्पीकरमध्ये एचडी ऑडिओ दिल्याचेही बोलले जात आहे. तसेच प्ले, पॉज आणि रिपीट अशी तीन स्वतंत्र बटणे दिलेली आहेत. या वायरलेस स्पीकरवर कंपनीने तीन महिने वॉरंटी आणि तीन महिने एक्सटेंडेड वॉरंटी अशी एकूण सहा महिन्यांची वॉरंटी दिली आहे. याची किंमत १,९९९ रुपये आहे. 

यूबॉनचा हा स्पीकर ऑनलाइन उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी या कंपनीने ‘यूबॉन पीबी एक्स-22 बॉस पॉवर’ नावाची पॉवरबँकही लाँच केली होती. ही पॉवरबँक ‘मेड इन इंडिया’ असल्याचे कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. 

‘मिवी’ (Mivi) या कंपनीनेदेखील ‘MIVI Octave 2’ हा ब्ल्यूटूथ स्पीकर लाँच केला आहे. या स्पीकरचा ऑडिओ, क्रिस्टल क्लिअर असल्याचे बोलले जात आहे. या स्पीकर संदर्भात बोलायचे झाले, तर यामध्ये ३६० डिग्री स्टेरिओ साउंड दिला आहे. या स्पीकर्सना आठ तासांचा बॅटरी बॅकअप दिला असल्याचा कंपनीचा दावा आहे. ‘MIVI Octave 2’ स्पीकर्सबद्दल विशेष बाब म्हणजे, हा स्पीकर IPX7 रेटेड आहे. म्हणजे या स्पीकरला पाणी आणि धुळीपासून कमी धोका आहे. 

‘मिवी’च्या स्पीकरमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 दिले आहे. तसेच चार्जिंगसाठी यामध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. यामध्ये मेमरी कार्ड आणि ऑक्स केबलसह इनबिल्ट माइकचाही सपोर्ट दिला आहे, तर 2200 Mah बॅटरी आहे. या स्पीकरचे डिझाइन बऱ्यापैकी ‘वंडरबूम’च्या स्पीकर्सप्रमाणे असल्याचे पाहायला मिळते. म्हणजेच या स्पीकरला 360 डिग्री साउंडसाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे कोणत्याही अँगलमध्ये स्पीकर ठेवला, तरी त्याचा आवाज डिस्टर्ब होणार नाही. या स्पीकरची किंमत २,९९९ रुपये असून यावर कंपनीने एक वर्षाची वॉरंटी दिली आहे.

संबंधित बातम्या