केंट आरओचा एअर प्युरिफायर

ज्योती बागल 
सोमवार, 28 डिसेंबर 2020

निरोगी राहण्यासाठी शुद्ध पाणीच प्यायले पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची हवादेखील तेवढीच शुद्ध असायला हवी. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतातील प्रसिद्ध वॉटर प्युरिफायर कंपनी केंट आरओने शुद्ध पाण्यासह शुद्ध हवा देण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत त्यांनी यूव्ही-सी लाइट डिसइन्फेक्शनसह नुकताच एक एलपीएस-प्लस एअर प्युरिफायर लाँच केला आहे. त्याविषयी सविस्तर... 

केंट आरओ सिस्टीम्स लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीने यूव्ही-सी लाइट डिसइन्फेक्शनसह नुकताच एक एलपीएस-प्लस एअर प्युरिफायर लाँच केला आहे. केंटच्या या एअर प्युरिफायरमध्ये यूव्ही-सी  डिसइन्फेक्टन्ट फीचरसह अशुद्ध हवेतील धोकादायक कणांना हटवण्यासाठी एचईपीए (HEPA ) या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या एचईपीए फिल्टर्समध्ये पीएम २.५ पार्टिक्युलेट (९९.९९ टक्क्यांपर्यंत), पॉलन, ॲलर्जी, धुळीचे कण, दुर्गंधी, सिगारेटचा धूर, घातक वायू आणि पाळीव प्राण्यांच्या शरीरातून येणारा वास नष्ट करण्याची क्षमता आहे. 
 
सध्या हवेतील प्रदूषण आणि साथीचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे लोक जास्तीतजास्त वेळ घरात घालवत आहेत. मात्र बाहेरील व्यक्ती घरात आल्यावर, त्यांच्या बोलण्याने, शिंकल्याने, खोकल्याने घरातील हवादेखील दूषित होऊ शकते. त्यामध्ये धूळ, जंतू, घातक वायू असे घटक असल्याने ते घरातील हवा अशुद्ध करू शकतात. अशा काही प्रदूषकांचे आयुर्मान किमान २४० तासांपर्यंत असते. अशा वातावरणात श्वास घेतल्यास दमा, फ्लू आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात.  
   
यूव्ही-सी डिसइन्फेक्शनसह केंट एएलपीएस प्लस (KENT ALPS PLUS ) एअर प्युरिफायरमध्ये प्रति तास ४०० सीडीआर एवढी उच्च क्षमता आहे, जी ४३० चौरस फूट क्षेत्रासाठी योग्य आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर हा एअर प्युरिफायर घरातील लिव्हिंग रूम किंवा लॉबीसाठी वापरता येऊ शकतो. केंटच्या या एअर प्युरिफायरची किंमत २९,९५० रुपये आहे. 
 
केंटचे हे एअर प्युरिफायर कॉम्पॅक्ट स्वरूपात डिझाईन केले आहे. तसेच यामध्ये इंटलिजंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग आणि फिल्टर रिप्लेसमेंट इंडिकेटर दिले आहे. शिवाय लहान मुलांच्या सेफ्टीसाठी चाईल्ड लॉकही आणि जास्त आवाज होऊ नये म्हणून नॉईज कॅन्सलेशन सारख्या स्मार्ट सुविधा उपलब्ध आहेत. अशा स्मार्ट फीचर्सने परिपूर्ण एअर प्युरिफायर सध्याच्या घडीला तर नक्कीच उपयोगी पडू शकतो.   

या नवीन प्युरिफायरसंदर्भात बोलताना केंट आरओ सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर महेश गुप्ता म्हणाले, ‘या आधीही बाजारात बरेच वेगवेगळे ॲडव्हान्स एअर प्युरिफायर आले आहेत, जे हवा शुद्ध करण्यासाठी मदत करतात. पण सध्याच्या महामारीने आपल्याला यावर पुन्हा विचार करण्यास भाग पाडले होते. अशा वेळी यूव्ही-सी लाइट डिसइन्फेक्शन चांगलेच उपयुक्त ठरत आहे. हे एअर प्युरिफायर तयार करताना आम्ही सद्यःस्थिती आणि हवेची गुणवत्ता याविषयीची चिंता लक्षात घेऊन अधिक नावीन्य आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा उत्पादनांसह आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.’
----------------------

संबंधित बातम्या