अनोखा स्मार्ट एअरड्रेसर 

ज्योती बागल 
रविवार, 10 जानेवारी 2021

प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपनी सॅमसंगने नुकतेच एक नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. या उत्पादनाची खासियत म्हणजे हा कोणता कॉम्प्युटर, मोबाईल, फ्रिज किंवा वॉशिंग मशीन नसून एक एअरड्रेसर आहे. सॅमसंगने आणलेल्या या एअरड्रेसरविषयी थोडक्यात... 

या एअरड्रेसरला कपड्यांची काळजी घेण्यासाठी असणारे पहिलेच स्मार्ट सोल्युशन म्हणता येईल. सॅमसंगचे हे नवीन इनोव्हेशन वाफ आणि जोरदार हवेच्या साहाय्याने कपड्यांवरील मळ तर काढतेच, शिवाय जंतू नष्ट करून, त्यांचे संक्रमण थांबवते, सॅनिटाईज करते. त्यामुळे कपड्यांची उत्तम काळजी घेण्यासाठी याचा वापर घर, कार्यालय, व्हीआयपी लाउंज, लक्झरी रिटेलर, डिझाइनर आणि हॉटेल अशा ठिकाणी करता येऊ शकतो.

सणवार किंवा खास कार्यक्रमांसाठी घेतले जाणारे कपडे बऱ्याचदा डिझाइनर आणि

नाजूक असतात. या प्रॉडक्टमुळे अशा कपड्यांची उत्तम काळजी घेतली जाईल; शिवाय असे कपडे वारंवार धुवावे लागणार नाहीत, त्यामुळे वेळेची आणि पैशांची बचतही होणार आहे. या स्मार्ट एअरड्रेसरमधील जेटस्टीम कपड्यांना स्वच्छ करून आणि ९९.९ टक्के विषाणू, जंतू नष्ट करून व्हायरसमुक्त करते. या स्मार्ट एअरड्रायर संदर्भात बोलताना सॅमसंग इंडिया, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन यांच्या म्हणण्यानुसार, ‘वापरकर्त्यांची गरज आणि कपड्यांची काळजी घेण्याची पद्धत बदलण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा एअरड्रायर तयार केला असून आम्हाला खात्री आहे की वापरकर्त्यांना याचा फायदा तर होईलच. या एअरड्रेसरची किंमत १ लाख १० हजार रुपये असून सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच ई-कॉमर्स वेबसाइट्सवरून खरेदी करू शकता. 

 एअरड्रायरने जेटस्टीम, जेटएअर, हिटपंप ड्रॉइंग, डीओडराइजिंग फिल्टर आणि सेल्फ क्लीन या एकूण पाच पद्धतींनी कोणतेही कपडे सॅनिटाईज आणि स्वच्छ करता येतात.

  • जेटस्टीम ः गरम वाफ कपड्यांचा आतपर्यंत जाऊन कपड्यांवरील सर्वप्रकारचे विषाणू, जंतू नष्ट करून कपडे सॅनिटाईज करते.
  • जेटएअर ः कपड्यांवर हवेचा जोरदार मारा करून कपड्यांवरील धूळ काढून टाकते.
  • हिटपंप ड्रॉइंग ः कपडे खराब होऊ नये यासाठी हे कपड्यांना कमी तापमानावर सुकवते.
  • डीओडराइजिंग फिल्टर ः कपड्यांना असलेला घामाचा वास, खाद्यपदार्थांचे वास काढून टाकतो. 
  • सेल्फ क्लीन ः स्मार्ट एअरड्रेसरला स्वच्छ ठेवण्याचे काम ही पद्धत करते.

संबंधित बातम्या