मल्टी फंक्शनल बॉक्स

ज्योती बागल
सोमवार, 11 जानेवारी 2021

हल्ली लोकांचे भटकंतीचे प्रमाण खूप वाढले आहे. काहीजण हौसेखातर भटकंती करतात, तर काहीजण कामाचा भाग म्हणून. अशावेळी स्मार्टफोन तर आवश्यक असतोच; शिवाय फोन्सच्या ॲक्सेसरीजही गरजेच्या असतात. अशावेळी स्मार्टफोनच्या सर्व ॲक्सेसरीज एकत्र आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो इनबेसचा मल्टी फंक्शनल बॉक्स!

गॅजेट्स ॲक्सेसरीज आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक ब्रँड असलेली भारतातील प्रसिद्ध कंपनी इनबेसने नुकतेच एक आगळेवेगळे आणि उपयुक्त असे गॅजेट लाँच केले आहे. हे गॅजेट म्हणजे ‘मल्टी-फंक्शनल बॉक्स’! इनबेस (Inbase) कंपनीने हा पहिलावहिला मल्टी फंक्शनल बॉक्स ( Multi Functional Box) लॉँच केला आहे. या मल्टी फंक्शनल बॉक्समध्ये सिम किटपासून फोन होल्डरदेखील उपलब्ध आहे. म्हणजेच या बॉक्समध्ये एका स्मार्टफोनसंबंधित बऱ्याच ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत. 3A फास्ट चार्जिंग टाइप सी ते टाइप सी केबल, टाइप सी ते मायक्रो ॲडाप्टर, टाइप सी ते लायटनिंग आणि टाइप सी ते यूएसबी 3.1 ओटीजी कनेक्टर असे एकपेक्षा जास्त केबल ॲडाप्टर्स आहेत.  

याशिवाय इनबेसच्या या बॉक्समध्ये टीएफ कार्ड आणि दोन नॅनो सिम कार्ड स्लॉट आहेत. तसेच मोबाइल सिम किंवा एसडी कार्ड ट्रे काढण्यासाठी एक इंजेक्शन पिनही आहे. याबरोबरच या डिव्हाइसच्या मागच्या बाजूला मोबाइल फोन ठेवण्यासाठी एक फोन होल्डरदेखील दिले आहे. मल्टी फंक्शनल बॉक्ससारखे उत्पादन बाजारात आणणारी ‘इनबेस’ ही पहिलीच कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या मल्टी फंक्शनल बॉक्सची किंमत १,२९९ रुपये असून बॉक्स काळ्या रंगात उपलब्ध आहे. बॉक्सला सहा महिन्यांची वॉरंटी दिली आहे. हा बॉक्स रिटेल आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता येऊ शकतो.

मल्टी फंक्शनल बॉक्सची वैशिष्ट्ये

  1. मल्टी केबल 4 इन 1
  2. सिम कीट
  3. कार्ड स्लॉट
  4. फोन क्रेडल
  5. सिम इंजेक्शन पिन
  6. फास्ट चार्जिंग
  7. इनोव्हेटिव्ह डिझाइन

संबंधित बातम्या