सॅमसंग फोन्सची नवी सीरीज

ज्योती बागल 
रविवार, 31 जानेवारी 2021

सॅमसंगने बऱ्याच काळानंतर सॅमसंग गॅलॅक्सी एस२१ ही सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये ‘गॅलॅक्सी एस २१’, ‘गॅलॅक्सी २१ प्लस’ आणि ‘गॅलॅक्सी एस २१ अल्ट्रा’ या तीन स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सॅमसंगने आणलेल्या या सीरीजबद्दल थोडक्यात...

सॅमसंगच्या या नवीन सीरीजच्या तीनही स्मार्टफोन्समध्ये नवीन प्रोसेसर Exynos 2100 दिला असून 5G चा सपोर्टही आहे. मात्र या तीनपैकी कोणत्याही फोनसह चार्जिंग ॲडॅप्टर मिळणार नसून फक्त टाइप-सी टू टाइप-सी केबल दिली जाणार आहे. सॅमसंग Galaxy S21, Galaxy 21 Plus आणि Galaxy S21 Ultra या तीनही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असणारा डिस्प्ले आहे. Galaxy S21 आणि Galaxy 21 Plus मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर Galaxy S21 Ultra मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच तीनही फोन्सना वॉटर आणि डस्टप्रूफसाठी IP68चे रेटिंग आहे.   

सॅमसंग Galaxy S21 आणि Galaxy 21 Plus मध्ये अँड्रॉइड 11 बेस्ड One UI आहे. Galaxy S21चा ६.२, तर Galaxy 21 Plusचा ६.७ इंच एचडी प्लस डायनॅमिक अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्युशन 1080 x 2400 पिक्सल आहे. या दोन्ही फोनमध्ये डिस्प्लेबरोबरच HDR10+ चा सपोर्टही दिला आहे. फोनमध्ये Exynos 2100 प्रोसेसर, 8 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून यामध्ये मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड, दुसरी लेन्स १२ मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा आहे, तर तिसरी ६४ मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स आहे. 

सॅमसंग Galaxy S21 Ultra मध्येदेखील अँड्रॉइड 11 बेस्ड One UI आहे. या व्यतिरिक्त 1440 x 3200 पिक्सल रिझोल्युशनसह फोनमध्ये ६.८ इंचाची डायनॅमिक अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले आहे. या फोनमध्येदेखील डिस्प्लेसह HDR10+ चा सपोर्ट दिला आहे. त्याबरोबरच या फोनमध्ये Exynos 2100 प्रोसेसर,12/16 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB स्टोरेज दिले आहे. क्वाड रिअर कॅमेऱ्यांमध्ये मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सेल, दुसरी लेन्स १२ मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा आणि तिसरी १० मेगापिक्सेलची टेलीफोटो लेन्स आहे. 

वरील तीनही फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि अल्ट्रासोनिक इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही मिळेल.

सॅमसंग गॅलॅक्सी एस २१ सीरीजच्या किमती  

  • Galaxy S21 (8+128GB): 69,999 रुपये (फँटम व्हायोलेट, व्हाईट, पिंक, ग्रे)
  • Galaxy S21 (8+256GB): 73,999 रुपये (फँटम व्हायोलेट, व्हाईट, ग्रे)
  • Galaxy S21+ (8+128GB): 81,999 रुपये (फँटम व्हायोलेट, सिल्वर, ब्लॅक)
  • Galaxy S21+ (8+256GB): 85,999 रुपये (फँटम व्हायोलेट, सिल्व्हर, ब्लॅक)
  • Galaxy S21 Ultra (12+256GB): 1,05,999 रुपये (फँटम ब्लॅक, सिल्व्हर)
  • Galaxy S21 Ultra (16+512GB): 1,16,999 रुपये (फँटम ब्लॅक)

संबंधित बातम्या