वायोची भारतात वापसी

ज्योती बागल 
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

व्हॉट्‌स न्यू

बऱ्याच कालावधीनंतर ‘वायो’ (Vaio) कंपनीने भारतीय बाजारात पुन्हा पदार्पण केले असून कंपनीने नुकतेच ‘Vaio E15’ आणि ‘Vaio SE14’ हे दोन लॅपटॉप लाँच केले आहेत. त्याविषयी थोडक्यात...

‘वायो’ने भारतीय बाजारात आणलेल्या या नवीन लॅपटॉपाचे मार्केटिंग ‘नेक्स्टगो’ (Nexstgo) ही हाँगकाँगची कंपनी करणार आहे. Vaio E15 मध्ये 15.6 इंच, तर Vaio SE14 मध्ये 14 इंच फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ प्री-इन्स्टॉल असेल. त्याबरोबरच Windows 10 Home दिले आहे. वायोने या दोन्ही लॅपटॉपमध्ये स्मार्ट एम्प्लिफायर आणि डॉल्बी ऑडिओ असलेले स्पीकर्स दिले आहे.   

Vaio E15 लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 किंवा AMD Ryzen 7 मोबाईल प्रोसेसर आहे. तसेच DDR4 रॅम आणि 512 GB चे एसएसडी स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, दोन यूएसबी 3.0 पोर्ट, मायक्रो एचडीएमआई, यूएसबी टाइप-सी पोर्ट, बॅकलाइट कीबोर्ड आणि ड्युअल स्पीकर दिला आहे. Vaio SE14 च्या डिस्प्लेला अँटी ग्लेअर कोटिंग आहे. याचा कीबोर्ड आयलँड स्टाइलचा असून त्याला बॅकलाईट सपोर्टही आहे. तसेच लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर i5 प्रोसेसर, 8 GB DDR4 रॅम आणि 512 GB चे SSD स्टोरेज दिले आहे. याबरोबरच यामध्ये चार स्पीकर, दोन यूएस बी टाइप-सी, एक यूएसबी 3.0, एचडीएमआई पोर्ट दिले आहे.  

Vaio E15 ची किंमत ६६,९९० रुपये असून हा लॅपटॉप इंक ब्लॅक आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे. तर Vaio SE14 ची किंमत ८४,६९० रुपये असून डार्क ग्रे आणि कॉपर रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्याव्यात  लॅपटॉप खरेदी करताना त्या लॅपटॉपचे हार्डवेअर, डिझाईन, फीचर्स, किंमत कम्पेअर करून पाहावी.  

रॅम आणि प्रोसेसर हे दोन्ही लॅपटॉपमधील महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार रॅम स्टोरेज आणि चांगल्या क्षमतेचा प्रोसेसर असलेल्या लॅपटॉपची निवड करावी. सध्या नवीन लॅपटॉपमध्ये इंटेल कोअर आय ३, आय ३, आय ५, आय ७ इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. रॅमच्या क्षमतेवर लॅपटॉपचा वेग ठरतो व त्यावर लॅपटॉपची किंमत. त्यामुळे तुमच्या कामासाठी किती जीबी रॅम पुरेशी आहे, याचाही विचार करावा. 

    जर लॅपटॉपवर जातीतजास्त वेळ काम असणार असेल तर लॅपटॉप खरेदी करताना स्क्रीन क्वालिटी, स्क्रीन रेझोल्युशन आवर्जून बघावे.

    स्टोरेज आणि कीबोर्ड हेदेखील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे जर टायपिंग हा तुमच्या कामाचा महत्त्वाचा भाग असेल, तर तुम्हाला कीबोर्डचा आकार आणि त्याची मांडणी लक्षात घ्यावी लागेल. तसेच डेटा साठवताना जागेची कमतरता भासू नये म्हणून स्टोरेजची गरजही लक्षात घ्यावी.

संबंधित बातम्या