‘झूक’चे बेस्ट गेमिंग माऊस

ज्योती बागल 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

फ्रेंच कंपनी ‘झूक’ने (ZOOOK) प्रोफेशनल आणि सुपिरिअर क्वालिटीचे दोन गेमिंग माऊस भारतात नुकतेच लाँच केले आहेत; ‘झूक टर्मिनेटर’ (Terminator) आणि ‘झूक बॉम्बर’ (Bomber). या गेमिंग माऊसविषयी थोडक्यात... 

झूक टर्मिनेटर 
हा गेमिंग माऊस वायरलेस असून याला रिचार्जही करता येते. गेमरचा गेम खेळताना गेमवर पूर्ण कंट्रोल राहावा यासाठी या माऊसला एकूण सात बटणे दिली आहेत. तसेच सात वेगवेगळे एलईडी बॅकलाईटही दिले आहेत. ऑन-ऑफसाठी एक बटण दिले आहे. याबरोबरच यामध्ये 600mAh ची लिथियमची बॅटरी दिली असून ती यूएसबी पोर्टच्या साहाय्याने चार्जही करता येते. या गेमिंग माऊसमध्ये ऑटो-स्लीपिंग मोड दिला आहे, माऊस चालू करून न वापरता १० मिनिटांच्या वर तसाच ठेवला तर तो स्लिप मोडवर जातो. या माऊसची बॉडी एबीसी (ABS) प्लॅस्टिकची असून यात लेदर कॉलर आणि रबर फिनिशिंग दिले आहे. माऊसची किंमत २,९९५ रुपये आहे. 

झूक बॉम्बर 
हा माऊस यूएसबी वायरवाला गेमिंग माऊस आहे. या माऊसला एकूण सहा बटणे दिली असून स्मूथ मुव्हमेंट, रिलायबल कनेक्टिव्हिटी आणि रिस्पॉन्सिव्ह ट्रॅकिंग ही याची खासियत आहे. याबरोबरच यामध्ये एक थम्ब फंक्शनही दिले आहे. तसेच चार रंगांचे RGB एलईडी लाईटही दिले आहेत. या बॉम्बर माऊसची बॉडीदेखील एबीसी (ABS) प्लॅस्टिकची असून यात लेदर कॉलर आणि रबरचे फिनिशिंग आहे. माऊसची किंमत १,४९९ रुपये आहे. 

हे दोन्ही माऊस ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्टोअर्समध्ये सर्वत्र उपलब्ध आहेत.  

‘झूक’ कंपनीने युजर्ससाठी नेहमीच इनोव्हेटिव्ह गेमिंग ॲक्सेसरीज, प्रॉडक्ट्स बाजारात आणले आहेत. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Stealth, Rambo, Stallone, Bravo, Sniper, Communicate, Killer, Killer Gold, GamerZ1 आणि Rifle हे दहा गेमिंग हेडफोन्सदेखील लाँच केले आहेत. या हेडफोनच्या 

किमती दोन हजार ते पाच हजारांच्या दरम्यान असून हे सर्व प्रोफेशनल हेडफोन्स आहेत.

संबंधित बातम्या