मोटोरोला स्मार्टफोन

ज्योती बागल
सोमवार, 3 मे 2021


व्हॉट्‌स न्यू

आज ॲडव्हान्स फीचर्ससह रोज एक नवीन ब्रँडचा, नवीन कंपनीचा स्मार्टफोन बाजारात दाखल होत असतो. कारण फीचर्स स्मार्टफोन्सची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. ‘मोटोरोला’नेदेखील ‘Moto G60’ आणि ‘Moto G40 Fusion’ हे दोन स्मार्टफोन नुकतेच भारतीय बाजारात लाँच केले आहेत. त्याविषयी थोडक्यात...  

मोटोरोलाच्या ‘Moto G60’ आणि ‘Moto G40 Fusion’ या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 732 G प्रोसेसर आणि 6,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी टर्बोपॉवर २० फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Moto G60 मध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले आहे. हे स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने वाढवताही येते. तर Moto G40 Fusion मध्ये 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज दिले आहे. यामध्येच 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेजचे मॉडेलदेखील उपलब्ध आहे. Moto G60 आणि Moto G40 Fusion हे दोन्ही फोन व्हेरियंट डायनॅमिक ग्रे आणि फ्रॉस्टेड शॅम्पेन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहेत.  

Moto G60 स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ११ आहे. ६.८ इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून यातील मेन लेन्स १०८ मेगापिक्सल आहे, तर दुसरी लेन्स अल्ट्रा वाइड ८ मेगापिक्सल आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सलची आहे. फ्रंट कॅमेरा मात्र ३२ मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ 5.0, 3.5 mm चा ऑडिओ जॅक, Wi-Fi, NFC, यूएसबी टाइप - सी पोर्ट आणि रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर ही फीचर्स आहेत.  

Moto G40 Fusion या फोनमध्येही अँड्रॉइड ११चा सपोर्ट दिला असून या फोनमध्येदेखील ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेटही 120Hz आहे. यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. ज्यामध्ये मेन लेन्स ६४ मेगापिक्सल, दुसरी लेन्स ८ मेगापिक्सल आणि तिसरी लेन्स २ मेगापिक्सलची आहे. सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. याबरोबरच कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, 3.5 mm चा ऑडिओ जॅक, Wi-Fi, NFC, यूएसबी टाइप - सी पोर्ट आणि रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर ही फीचर्स आहेत.  

या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री फ्लिपकार्टवरून होणार आहे. Moto G60 स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. Moto G40 Fusion ची विक्री १ मेपासून सुरू होईल. Moto G60 ची किंमत १७,९९९ रुपये आहे, तर Moto G40 Fusion च्या दोन्ही फोन्सची किंमत प्रत्येकी १३,९९९ आणि  १५,९९९ रुपये आहे.

संबंधित बातम्या