मुलांसाठी खास टॅब 

ज्योती बागल
सोमवार, 17 मे 2021

व्हॉट्‌स न्यू

सध्या पालकांचे जसे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे तसेच मुलांसाठी ‘स्कूल फ्रॉम होम’ म्हणजेच ऑनलाइन शाळा सुरू आहे. अशातच पालकांना कामातून पुरेसा वेळ मिळत नसला, तरी मुलांना भरपूर मोकळा वेळ असतो. या मोकळ्या वेळात लहान मुले घरात राहून रोज काही ना काही नवीन, इनोव्हेटिव्ह शिकत आहेत. अशा मुलांना ॲमेझॉनने आणलेल्या खास ‘टॅब’चा उपयोग होणार आहे, त्याविषयी थोडक्यात...    

ॲमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने लहान मुलांसाठी खास काही टॅब्लेट्स (Tablets) लाँच केले आहेत. हे टॅब साधारण ३ ते १२ या वयोगटातील मुलांसाठी असणार आहेत. ६ ते १२ वर्षे वयोगातील मुलांसाठी All-New FireKids Pro टॅब आणि ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Next Generation Fire HD 10 Kids टॅब असतील.   

या Fire Kids Pro टॅबच्या किमतींबद्दल बोलायचे झाले, तर Fire 7 Kids Pro टॅबची किंमत ७,४०० रुपये आहे. Fire HD 8 Kids Pro टॅबची किंमत आहे १०,४०० रुपये. तर FireHD 10 Kids Pro टॅबची किंमत आहे १५ हजार रुपये! 

‘आई-वडिलांना त्यांच्या मुलांच्या टॅबमध्ये जे हवे असते ते सर्व ‘Fire Kids Pro टॅबमध्ये आहे. जास्तीत जास्त कन्टेंट, नवीन सुविधा आणि अधिक सोशल कनेक्शन्स याबरोबरच सुरक्षितपणे सर्च करण्याचे स्वातंत्र्य ही सर्व फीचर्स ६ ते १२ या वयोगातील मुलांना शिकण्याचा उत्कृष्ट अनुभव देतात.’ अशी माहिती ॲमेझॉन किड्स अँड किड्स प्लसचे जनरल मॅनेजर कर्ट बीडलर यांनी दिली आहे.      

Next-Generation Fire HD 10 Kidsमध्ये एक Fire HD 10 Tablet चाही समावेश असून यामध्ये बारा तासांची बॅटरी लाईफ आणि यूएसबी टाईप सी (USB Type-C) पोर्ट दिले आहे. या टॅब संदर्भात कंपनीने असेही म्हटले आहे, की या टॅबच्या १०.१ इंचाच्या एचडी डिस्प्लेमुळे उत्तम परफॉर्मन्ससह व्हिडिओचा शानदार अनुभव घेता येतो.

ॲमेझॉन किड्स प्लस (Amazon Kids +) मुलांना २० हजारपेक्षा जास्त पुस्तके, ऑडियो बुक्स, एज्युकेशनल ॲप्स, सिनेमे, टिव्ही शो, स्पॅनिश लँग्वेज कन्टेंट आणि गेम्स उपलब्ध करून देते. हे सर्व KidsContent Experts द्वारे डिझाईन केले आहे. ॲमेझॉन किड्सच्या ‘फ्री पॅरेन्टल कंट्रोल’च्या मदतीने पालक मुलांच्या स्क्रीन टाइम आणि डिझिटल कन्टेंटवर लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे सध्याच्या काळात मुलांना शिक्षणाबरोबरच विरंगुळा म्हणून हे टॅब उपयुक्त ठरू शकतात.

संबंधित बातम्या