पोर्टेबल मल्टिपर्पज ग्रूमिंग किट

ज्योती बागल
सोमवार, 31 मे 2021

व्हॉट्‌स न्यू

लाईफस्टाईल ॲक्सेसरीजमध्ये एम्ब्रेन कंपनीने चांगलाच जम बसवला आहे. पर्सनल केअर सेगमेंट अंतर्गत कंपनीने नुकतेच काही नवीन प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत. एम्ब्रेनने ट्रीमर आणि ग्रूमिंग किटची नवीन रेंज लॉँच केली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक वस्तू पुरविणारी दुकाने सुरू आहेत, त्यामुळे सलून्सदेखील बंद आहेत. अशावेळी या गॅजेट्सच्या मदतीने घरच्या घरी ट्रीमिंग आणि ग्रूमिंग करता येऊ शकते. त्यामुळे उपयुक्त अशा या गॅजेट्सची थोडक्यात माहिती...  

एम्ब्रेन (Ambrane) इंडियाने ट्रीमर आणि ग्रूमिंग किट असे दोन प्रॉडक्ट लॉँच केले आहेत. एम्ब्रेन क्रुझर मिनी हाय टेक्नॉलॉजीचे एक मल्टिपर्पज ग्रूमिंग किट असून याची किंमत १,६९९ रुपये आहे. या दोन्ही प्रॉडक्टवर एक वर्षाची वॉरंटी दिली आहे. या ग्रूमिंग किटबरोबर पोर्टेबल आणि स्टायलिश स्टोरेज ट्रेदेखील मिळतो. 

या प्रॉडक्टच्या मदतीने अगदी सहजपणे आणि पटकन केस, मिशा आणि दाढीची स्टाइल, ट्रीमिंग किंवा शेव्हिंग करता येते. त्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या १० सेटिंग्ज दिल्या आहेत. याचा वापर करताना मजबूत पकड मिळावी म्हणून रबर फिनिशसह याचे डिझाईन केले आहे. हे सलग ६० मिनिटांपेक्षाही जास्त वेळ चालते. यामध्ये ६०० एमएएचची लिथियम बॅटरी आहे. यातील ‘ऑरा-एस ट्रीमर’मध्ये वेगवेगळ्या २० लेंथ सेटिंग्ज आणि दोन प्रकारचे कंगवे येतात. उत्तम बॅटरी बॅकअप असल्याने जवळजवळ ९० मिनिटे कॉर्डलेस पद्धतीने शेव्हिंग आणि ट्रीमिंग करता येते. IPX7 वॉटरप्रूफ रेटिंग असलेल्या या ट्रीमरची किंमत आहे १,४९९ रुपये. 

या ग्रूमिंग रेंजमध्ये ‘ऑरा-एक्स ट्रीमर’ हे नवीन प्रॉडक्ट असून यामध्ये १७ प्रकारच्या लेंथ सेटिंग्ज उपलब्ध आहेत. त्याबरोबरच ॲडजस्टेबल छोटा कंगवाही मिळतो. म्हणजेच लांब आणि छोट्या केसांच्या ॲडजेस्टमेंटनुसार मुव्हेबल असा ०.५ एमएम ते १० एमएमचा कंगवा दिला आहे. तसेच याचे ब्लेड चांगल्याप्रकारे डिझाईन केले असल्याने ट्रीमिंग किंवा शेव्हिंग करताना कापण्याची भीती नाही. शिवाय हा ट्रीमर स्मार्ट एलईडी लाइटसह उपलब्ध आहे. याचे चार्जिंगही पटकन होते आणि किमान दोन तास तरी पुरते. या ‘ऑरा-एक्स ट्रीमर’ची किंमत १,२९९ रुपये आहे.   

या ग्रूमिंग किटचे एकूण फीचर्स आणि फायदे बघता तरुणांना हा नक्कीच उपयोगी ठरू शकते. शिवाय विक्रीसाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने बाहेर कुठे शोधण्याची गरजही नाही.

संबंधित बातम्या