केंटचा स्मार्ट होमकॅम 

ज्योती बागल
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

व्हॉट्‌स न्यू

वॉटर प्युरिफायर ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘केंट’ कंपनीने आता होम सिक्युरिटीच्या क्षेत्रातही पदार्पण केले आहे. कंपनीने घराच्या सुरक्षिततेसाठी एक स्मार्ट कॅमेरा नुकताच बाजारात आणला आहे. या कॅमेऱ्याविषयी थोडक्यात...   

‘केंट’ने भारतीय बाजारात एक नवीन अत्याधुनिक स्मार्ट वाय-फाय होमकॅम 

कॅमेरा लॉँच केला आहे. ‘केंट कॅमआय होमकॅम 360’ असे या कॅमेऱ्याचे 

नाव आहे. हा कॅमेरा मेड इन इंडिया कॅमेऱ्यांपैकी सगळ्यात चांगला कॅमेरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा पूर्ण कॅमेरा भारतातच तयार केला असून कॅमेऱ्याचे रिसर्च, डिझाईन आणि डेव्हलपमेंटदेखील पूर्णपणे भारतातच केले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शिवाय या कॅमेऱ्याशी संबंधित सर्व डेटा आणि सर्व्हर भारतातीलच आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या काही निवडक कॅमेऱ्यांपैकी हा एक आहे, जो क्लाउडवर व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. 

‘केंट कॅमआय होमकॅम 360’ हा या ब्रँडचा दुसरा सुरक्षा कॅमेरा आहे. या होमकॅममध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) पॉवर्ड मोशन डिटेक्शन आणि ट्रॅकिंगसह ह्युमन डिटेक्शन, ३६० डिग्री पॅनोरॅमिक व्हिजन पॅन आणि टिल्टसारखे फीचर्स दिले आहेत. त्याव्यतिरिक्त इतर फीचर्समध्ये आयआर एलइडीज(IR LEDs) सह नाईट व्हिजन, टू-वे कॉलिंग, लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग, क्लाउड रेकॉर्डिंग, प्रायव्हसी मोड, कंटिन्यू किंवा इव्हेंट आधारित रेकॉर्डिंग, ऑनलाइन मोड रेकॉर्डिंग, इन्ट्रुडर अलार्म, इंटुएटीव्ह ॲप, एकपेक्षा जास्त माउंटिंग पर्याय आणि असे आणखी काही उपयुक्त फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत.     

हा कॅमेरा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असा समांतर एरिया कव्हर करून कुठलीही जागा सुटणार नाही हे निश्चित करतो. तसेच स्मार्टफोन ॲपच्या साहाय्याने पॅन किंवा टिल्ट करून एफएचडी (1080p) रिझोल्युशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतो. एआय पॉवर्ड मोशन डिटेक्शन फिचरच्या माध्यमातून हा कॅमेरा तुमच्या घरात होणारी छोटीशी हालचालही ओळखतो आणि केंट कॅमआय ॲपद्वारे तुमच्या स्मार्टफोनवर नोटिफिकेशन पाठवतो. हा कॅमेरा एखाद्या हलणाऱ्या वस्तूला फॉलो करून त्याची गतीदेखील रेकॉर्ड करतो. या कॅमेऱ्यात एआयआधारित ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली असल्याने हा कॅमेरा मानवी शरीर ओळखण्यास सक्षम आहे.  

    आयआर एलईडी आणि नाईट व्हिजनसह हा कॅमेरा रात्रीदेखील तुमच्या घरावर लक्ष ठेवतो. या कॅमेऱ्याला फक्त सेटअपच्यावेळी इंटरनेटची आवश्यकता असते. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसतानाही हा मायक्रो एसडी कार्डमध्ये रेकॉर्ड करणे सुरू ठेवतो आणि जेव्हा इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू होते तेव्हा क्लाउडमध्ये रेकॉर्डिंग सेव्ह करतो. क्लाउडवर रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओंना तीस दिवसांपर्यंत ॲक्सेस असतो. मायक्रो एसडी कार्डवरील स्टोरेज क्षमता १२८ जीबीपर्यंत असून या कार्डवर ६० दिवसांपर्यंत व्हिडिओ स्टोअर होऊ शकतात. या कॅमेऱ्याची किंमत ₹   ४,९९० आहे. 

केंटने सिक्युरिटी कॅमेऱ्यासह एक कारकॅमही लॉँच केला असून हा कॅमेरा गाडीमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डिझाईन केला आहे.

 

संबंधित बातम्या