‘नोकिया, दायवा’चे स्मार्ट टीव्ही  

ज्योती बागल
सोमवार, 15 जून 2020

व्हॉट्‌स न्यू

अलीकडच्या काळात स्मार्ट टीव्हींची लोकप्रियता  दिवसेंदिवस  वाढत आहे. टीव्हींची वाढती लोकप्रियता  लक्षात घेऊन अनेक प्रसिद्ध स्मार्टफोन्स  कंपन्या आपले  स्मार्ट टीव्हीही  बाजारात आणत आहेत. नोकिया आणि  दायवा या दोन कंपन्यांनी नुकतेच आपले स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत, त्यांची माहिती...

नोकिया, मोबाइलमधील जुनी आणि  प्रसिद्ध कंपनी. ही कंपनीदेखील आता मोबाइलबरोबरच इतरही प्रॉडक्ट्स  बाजारात आणत आहे. नुकताच नोकियाने एक  ४३ इंची स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत  ३१,९९९ रुपये एवढी आहे. ग्राहकांना नोकियाच्या या  स्मार्ट टीव्हीमध्ये  जीबीएल आणि डॉल्बी ऑडिओची साउंड सिस्टीम  मिळणार आहे. 

नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीची खासियत म्हणजे यामध्ये कंपनीने नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने प्लस हॉटस्टार, G5 आणि यूट्युब अॅपचाही अॅक्सेस दिला आहे. याधीही  कंपनीने एक  स्मार्ट  टीव्ही लाँच केला होता. मात्र तो  ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टबरोबर बाजारात आणला होता. आत्ताचा हा स्मार्ट टीव्ही ग्राहक फ्लिपकार्टच्या साइटवरूनही खरेदी करू शकतात. या  टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय जर  कम्प्लिट प्रोटेक्शन पॅक खरेदी केला,  तर  त्यावर दोन वर्षांची वॉरंटी मिळते. 

या  स्मार्ट टीव्हीमध्ये  नोकियाने ४३ इंचाचा  4K LED डिस्प्ले दिला असून त्याचे रिझोल्युशन 3840 × 2160 पिक्सल आहे. तसेच टीव्हीमध्ये अँड्रॉइड ९.० सह  गुगल प्ले-स्टोअरची सुविधाही दिली आहे.  इतर फीचर्सचा विचार केला तर  १ गिगाहर्ट्सचा क्वाड कोर प्रोसेसर दिला आहे. त्याचबरोबर 2GB रॅम  आणि 16GB स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीला वाय-फाय, ब्लुटूथ आणि 3 एक्स एचडीएमआयसारखे फीचर्स दिले आहे. 

दायवा (Daiwa) या कंपनीनेदेखील दोन  स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. यामध्ये  एक D43QUHS -109 सेमी - 4K UHD आहे, तर  दुसरा  D43QFS -109 सेमी - FHD हे LED टीव्ही आहेत.  D43QUHS या  टीव्हीची किंमत २४,९९९ रुपये आहे, तर  D43QFS टीव्हीची किंमत २१,९९० रुपये एवढी आहे. या दोन्ही  स्मार्ट टीव्हींवर दोन वर्षांची वॉरंटी दिली असून हे टीव्ही विक्रीसाठी सर्वत्र उपलब्ध आहेत. दायवा  कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या स्मार्ट टीव्हीसाठी  Dbx-tv चा ऑडिओ असल्याने वेगळ्या साउंडबारची गरज पडणार नाही.  साउंड टेक्नॉलॉजीबरोबर भागीदारी केली आहे. 

यामध्ये ‘द बिग वॉल’ म्हणून एक फीचर दिले आहे, ज्यामध्ये १७ लाख पेक्षा जास्त तासांचा कंटेन्ट मूव्ही बॉक्समध्ये देते. या मूव्ही बॉक्समध्ये जवळजवळ १६ वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळे जॉनर असलेले १० हजारांपेक्षा जास्त  चित्रपट आहेत. शिवाय यामध्ये  हॉटस्टार, G5, सोनी लाइव्ह, 
व्हूट, जिओ सिनेमा यांसारख्या  ॲप्सचाही ॲक्सेस दिला आहे. तसेच अँड्रॉइड  9.0  आणि क्वाड कोर प्रोसेसर दिले आहे. पहिल्या टीव्हीमध्ये अँड्रॉइड 9.0 आणि क्वाड कोर प्रोसेसरसह 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिले आहे, तर फुल एचडी टीव्हीमध्ये अँड्रॉइड  8.0 आणि  क्वॉड कोर प्रोसेसरसह  1GB  रॅम आणि  8GB  इंटर्नल स्टोरेज दिले आहे.

दायवाच्या स्मार्ट टीव्हीची खासियत म्हणजे, या टीव्हीचा एआय व्हॉल्युम कंट्रोल फीचर टीव्हीवर येणाऱ्या जाहिरातींचा मोठा आवाज आपोआप कमी करतो. शिवाय डिस्प्लेसाठी D43QUHS स्मार्ट टीव्हीला 4K अल्ट्रा एचडी 3840 x 2160 पिक्सल एवढे रिझोल्युशन आहे, तर D43QFS चे फुल एचडी रिझोल्युशन आहे. या दोन्ही टीव्हींमध्ये कंटेन्ट डिस्कव्हरी इंजिनचे फीचरही दिले आहे. त्यामुळे एखादा कार्यक्रम बघत असतानाही तुम्ही त्याच स्क्रीनवर वेगळा डिजिटल कंटेन्टही बघू शकता. त्यासाठी सारखे सारखे पोर्ट बदलण्याची गरज पडणार नाही.    

संबंधित बातम्या