ट्रेंडी राइस कुकर्स

ज्योती बागल
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

व्हॉट्‌स न्यू
हल्ली मॉड्युलर किचनला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे किचनमध्ये असणारी होम अप्लायन्सेसही जास्तीत जास्त स्मार्ट आणि ट्रेंडी असण्यावर भर दिसतो... अशाच ट्रेंडी लुकमध्ये नव्याने बाजारात आलेल्या राइस कुकर्सविषयी...

प्रेस्टिज डिलाइट इलेक्ट्रिक राइस कुकर क्युट 1.8-2 (700-वॅट्स) : हा एक स्मार्ट कुकर असल्याने यामध्ये वेगवेगळ्या डिशेस करता येतात. याची १.८ लिटर एवढी क्षमता असल्याने एका मोठ्या कुटुंबाला पुरेल एवढा भात एकावेळी करता येतो. कुकरमधील पदार्थ गरम राहण्यासाठी आणि पदार्थ तयार करण्यासाठी असे वेगवेगळे स्विच दिले आहेत. या कुकरचा कलर सिल्की रेड असल्याने तो जास्त आकर्षक दिसतो. याची हॅंडल्सही अगदी कुल लुकमध्ये दिसतात. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्याने हा कुकर कुठेही कॅरी करता येतो. या कुकरबरोबर दोन ॲल्युमिनिअमचे पॅनही येतात. 

बजाज आरसीएक्स 5 : हा कुकर १.८ लिटरचा असून वापरायला सहज आणि सोपा आहे. याला बाजूला दोन हँडल्स आहेत, त्यामुळे हा सहज पकडता येतो. याचे वजनही कमी आहे. याचा रंग पांढरा असल्याने जास्त छान दिसतो. या कुकरमध्ये वापरलेला बोल अॅल्युमिनिअमचा असून स्टेनलेस स्टीलच्या झाकणात व्हेंट असल्याने हा अधिक सुरक्षित आहे. हा कुकर साधारण ५५० एवढी ऊर्जा वापरतो. ५-६ व्यक्ती असलेल्या कुटुंबासाठी हा कुकर पुरेसा आहे. मात्र, यामध्ये भात करताना तांदूळ आधी भिजवून घेण्याची गरज असते.  

बटरफ्लाय वेव्ह 1.2 एल मल्टी-कुकर :  हा कुकर सिल्व्हर विथ ब्लॅक रंगात पाहायला मिळतो. या मल्टी-युटिलिटी कुकरमध्ये आपल्याला राइस, नूडल्स, सूप, पास्ता आणि चहा, कॉफी करता येते. तसेच यामध्ये अंडीही उकडता येतात. एकावेळी किमान सहा अंडी तरी उकडता येतात. याचा लुकही एकदम स्टायलिश असून उत्कृष्ट डिझाइन आहे. यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक सेफ्टी फीचर्स दिले असून ऑटोमॅटिक कट-ऑफचा पर्यायही दिला आहे. मात्र, दररोज हा कुकर साफ करणे आव्हानात्मक असल्याचे बोलले जाते. 

पॅनसोनिक एसआर-वाई18 एफएचएस 660-वॅट ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक कुकर : कोणत्याही कुटुंबासाठी पुरेल असा हा १.८ लिटर क्षमता असलेल्या कुकरमध्ये ६६० वॅटची मोटर आहे, त्यामुळे ऊर्जेचीही बचत होते. यामध्ये हायजिनिक कुकिंग पॅन आणि प्लेट्स वापरल्या आहेत. त्या नॉन-स्टिक असल्याने भात तळाशी चिकटत नाही व कुकर स्वच्छ करणे सोयीचे जाते. हा कुकर तयार करताना यामध्ये आरओएचएसचा वापर केल्याने हा हायजिनिक मानला जातो. मात्र, हा कुकर इलेक्ट्रॉनिक असूनही यामध्ये टायमर सिस्टीम दिलेली नाही. 

बजाज मॅजेस्टी आरसीएक्स 1 मिनी 0.4 - लिटर मल्टी-फंक्शन राईस कुकर : हा कुकर अगदीच लहान असल्याने एक किंवा दोन व्यक्तींसाठी योग्य आहे. या कुकरचे झाकण पारदर्शक असल्याने भात शिजत असताना वरूनदेखील लक्ष ठेवता येते. हा कुकर कॉम्पॅक्ट असल्याने किचन ओट्यावरील जास्त जागा अडत नाही. वजनाने हलका असल्याने कुठेही नेता येतो; अगदी छोटेखानी ट्रीपलाही नेता येईल. कमी शिजलेला भात आवडणाऱ्यांसाठी हा कुकर उत्तम आहे. 

हे सर्व कुकर्स ऑनलाइन उपलब्ध असून यांच्या सर्वसाधारण किमती एक हजार ते तीन हजारच्या दरम्यान आहेत. याशिवाय कुकरमध्ये इतर अनेक ट्रेंडी पर्यायही उपलब्ध आहेत. 

संबंधित बातम्या