वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 5 जुलै 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

हृदयराेग टाळू
हृदयरोगाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत, ‘हे बदलत्या जीवनशैलीचा भाग?’ हा डॉ.राजेश धोपेश्‍वरकर यांचा लेख वाचून लक्षात आले. हृदयरोग टाळण्यासाठी प्रत्येकाने शारीरिक स्वास्थ्याला व मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देणे आवश्‍यक आहे, हा डॉ.राजेश धोपेश्‍वरकर यांनी दिलेला सल्ला लाखमोलाचा वाटतो. हृदयरोगाबाबत अतिशय चांगली माहिती या लेखातून मिळाली.
राहुल सावंत, बदलापूर

 

बाह्यरंगाबरोबर अंतरंगदेखील सुंदर 
२६ मेच्या अंकाचे बाह्यरंग, अंतरंगदेखील सुंदर आणि वाचनीय होते. ’कर्नाटकचा कौल’ या कव्हरस्टोरीपासून वाचकांची अंक वाचण्याची उत्कंठा वाढत जाते. हितगूज, आरोग्याचा मूलमंत्र, क्रीडांगण, पुस्तक परिचय, शब्दकोडे, हास्यचित्रे...तब्बल ५८ पाने सबकुछ ’वाचनेबल’. साप्ताहिकांच्या मांदियाळीत सकाळ साप्ताहिकाने आपले वेगळेपण जपले आहे. म्हणूनच वाचकांच्या पसंतीस ते उतरते आहे. माझ्या सकाळ साप्ताहिकाकडून काही अपेक्षा आहेत. हास्यचित्रांशिवाय चार ते पाच विनोदी चुटकेदेखील अंकाची रंगत वाढवतील, असे वाटते.  
अशोक वा. कोर्टीकर, पंढरपूर

संबंधित बातम्या