वाचक लिहितात... 

वाचक
गुरुवार, 19 जुलै 2018

'हमीभाव' निवडणुकीसाठी
’हमीभावाची फसवी पेरणी’ हा रमेश जाधव यांचा लेख वाचनीय आहे. त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, की राजकीय फायद्यासाठी हमीभाव जाहीर केला आहे. त्यांचे हे मत पटते आहे. कारण आगामी मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये या घोषणेचा सरकारला फायदा होईल. मात्र शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. कारण निवडणुकीनंतर जाहीर केलेल्या हमीभाव सरकार देणार नाही, असे वाटते. शिवाय हमीभाव दिल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येऊन महागाई वाढले.

  - अविनाश पवार, फलटण

संघर्षाला सलाम
’संघर्ष अजूनही संपला नाही’ हा लेख साप्ताहिक सकाळच्या १४ जुलैच्या अंकामध्ये वाचला. साहित्य अकादमी मिळालेला लेखक अजूनही स्थिर आयुष्य जगण्यासाठी झटतो आहे, हे वाचून वाईट वाटले. पुरस्कार मिळाल्यामुळे ’फेसाटी’चे लेखक नवनाथ गोरे काही काळ प्रकाशझोतात राहतील, मात्र त्यानंतर काय? त्यांना नोकरी मिळेल का? हा प्रश्‍न खूप अस्वस्थ करतो आहे. मला वाटते आहे की सरकारने पुढाकार घेऊन नवनाथ गोरे यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. नवनाथ यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना सलाम.

अमोल गंगावणे, बारामती     

ऑनलाइनचा उत्कृष्ट ’धडा’!
’सकाळ साप्ताहिक’च्या १४ जुलैच्या अंकातील संपादकीय ’ऑनलाइनची जबाबदारी’ जेवढे औचित्यपूर्ण तेवढेच मार्गदर्शक वाटले. आजकाल ज्यांना ऑनलाइनचे व्यवहार कळत नाहीत, जमत नाहीत त्यांना अनाडी निरक्षर समजायला त्यांचीही हरकत नसावी. सध्या ऑनलाइन फसवणूक कशी चालते, याची प्रस्तुत दोन उदाहरणे संपादकीयमध्ये दिली आहेत. निवृत्त पोलिस अधिकारी सोपान चौधरी आणि गृहकर्जाच्या बतावणीतून सव्वा लाखाला फसलेली ती महिला. अशी फसवणूक करणारे जे ठकसेन असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर झालीच पाहिजे; पण अशा प्रकरणात फसलेल्या व्यक्तीलाही अधिक दोषी मानले गेले पाहिजे. कारण अनोळखी व्यक्तीवर आंधळा विश्‍वास ठेवून ते आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती देत असतात.    
   
अशोक वा. कोर्टीकर, पंढरपूर

संबंधित बातम्या