वाचक लिहितात...

वाचक
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

उपयुक्त माहिती मिळाली
मी शेतकरी असून ‘सकाळ साप्ताहिक’चा नियमित वाचक आहे. २५ ऑगस्टच्या ’धडपड जीव वाचविण्याची’ या अंकात उपयुक्त माहिती मिळाली. मुखपृष्ठ अगदी योग्य आहे. या अंकातील ‘मोमो चॅलेंज- मुलांना जपा’ हा हितगूज सदरातील लेख मार्गदर्शक आहे. मोबाईलचा व मोबाईल गेम्स यांचा जास्त वापर आरोग्यास बाधक आहे. अतिवापरामुळे मेंदूवर दुष्परिणाम होतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे, हे कळते पण वळत नाही. ही माहिती योग्य वाटली. 
 माधवराव शंकरराव पाटील, पिंपळगाव हरेश्‍वर, जळगाव

’चाय गर्रर्रऽऽऽर्रमऽऽ’ आवडला
‘सकाळ साप्ताहिक’चा ८ सप्टेंबरचा ’चाय गर्रर्रऽऽऽर्रमऽऽ’ या अंकामधील ‘टी ॲक्‍सेसरीजची क्रेझ’ हा समृद्धी धायगुडे यांचा लेख आवडला. टी ॲक्‍सेसरीजची दिलेली माहिती उपयुक्त आहे. तसेच प्राजक्ता ढेकळे यांचा ’कडक स्पेशल भारतीय जलपान’  हा लेख महत्त्वपूर्ण वाटला. या लेखातून इंजिनिअरने सुरू केलेला चहा व्यवसाय, त्याच्या संघर्षास कुटुंबीयांनी दिलेली साथ, कौशल्यधिष्ठीत शिक्षणाची गरज अशी चांगली माहिती मिळाली. या उत्तम लेखाबद्दल लेखिकेचे अभिनंदन. तसेच या अंकातील चहाविषयी असलेली माहिती देणारे इतर लेख देखील आवडले.
 समीर कुलकर्णी, कोल्हापूर

पावसाचे दिलेले संदर्भ अप्रतिम
सकाळ साप्ताहिकचा ‘पाऊसधारा’ हा ११ ऑगस्टचा अंक मधील प्राजक्ता कुंभार यांचा ‘पाऊस न आवडे सर्वांना‘ हा लेख खूप खूप, मनापासून आवडला. त्यांनी न आवडणाऱ्या पावसाचे वर्णन त्याचे दिलेले संदर्भ अप्रतिम असेच होते. उत्तम लेखाबद्दल प्राजक्ता कुंभार यांना मनापासून धन्यवाद. 
– ज्ञानेश्‍वर कुंभार (ई-मेलवरुन)

संबंधित बातम्या