वाचक  

वाचक
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

आडवळणावर असूनही जवळ
 ‘सकाळ साप्ताहिक’चा मी नियमित वाचक आहे. २९ सप्टेंबरच्या अंकामधील ‘आडवळणावर’ या सदरातील ‘निसर्गरम्य परिसरातील फेरफटका’ हा उदय ठाकूरदेसाई यांचा लेख खूप आवडला. फारशी गर्दी नसणाऱ्या आडवळणावरच्या ठिकाणांविषयी वाचून मन आनंदून जाते आणि या ठिकाणी एकदातरी नक्की जाऊन यावे असे वाटते. निसर्गवर्णनाबरोबरच या ठिकाणी कसे जायचे आणि मुंबई, पुण्याहून किती अंतर आहे, ही दिलेली माहिती मला उपयुक्त वाटली. त्यामुळे लाडघर, मुरुड, आंजर्ली, केळशी या निसर्गरम्य परिसरात कुटुंबासोबत फेरफटका नक्की मारणार.

राजेंद्र जोशी, पुणे

आडवळणावर असूनही जवळ
 ‘सकाळ साप्ताहिक’चा मी नियमित वाचक आहे. २९ सप्टेंबरच्या अंकामधील ‘आडवळणावर’ या सदरातील ‘निसर्गरम्य परिसरातील फेरफटका’ हा उदय ठाकूरदेसाई यांचा लेख खूप आवडला. फारशी गर्दी नसणाऱ्या आडवळणावरच्या ठिकाणांविषयी वाचून मन आनंदून जाते आणि या ठिकाणी एकदातरी नक्की जाऊन यावे असे वाटते. निसर्गवर्णनाबरोबरच या ठिकाणी कसे जायचे आणि मुंबई, पुण्याहून किती अंतर आहे, ही दिलेली माहिती मला उपयुक्त वाटली. त्यामुळे लाडघर, मुरुड, आंजर्ली, केळशी या निसर्गरम्य परिसरात कुटुंबासोबत फेरफटका नक्की मारणार.

राजेंद्र जोशी, पुणे

नाओमीचे यश कौतुकास्पद 
अमेरिकन ओपन स्पर्धेत सेरेना विल्यम्सला हरवून नाओमीने विजेतेपद मिळवले. मात्र नोओमीच्या विजेतेपदापेक्षा सेरेनाचीच चर्चा सर्वाधिक झाली. त्यामुळे नाओमीविषयी जेवढे लिखाण विजेती म्हणून होणे अपेक्षित होते ते कुठेच झाल्याचे दिसत नाही. सकाळ साप्ताहिक मात्र याला अपवाद ठरले. त्याबद्दल तुमचे आभार. साप्ताहिक सकाळच्या २९ सप्टेंबरच्या अंकामध्ये किशोर पेटकर यांचा ‘नाओमीचे ग्रॅंड स्लॅम यश’ या लेखात नाओमीच्या विजेतेपदापर्यंतचा प्रवास सोप्या भाषेत मांडला आहे. नाओमीने सेरेनासारख्या मातब्बर खेळाडूविरुद्ध मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. 

रमेश भोंग, इंदापूर

...तर प्रचाराची गरज नसती!
 ‘सकाळ साप्ताहिक’च्या १५ सप्टेंबरच्या अंकातील सत्तेसाठी आटापिटा! ही कलंदरने दिलेली माहिती वाचली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युगपुरुषाचा सत्ता मिळवण्यासाठी जो आटापिटा चालला आहे, ते वाचून हसूच आले. मला वाटते, की युगपुरुषांनी खरोखरच काम केले असते तर राज्याराज्यांत प्रचार करण्याची त्यांच्यावर वेळ आली नसती. पण सांगणार तरी काय? ‘अच्छे दिन’चा तर उच्चारच नाही. ‘सब का साथ सबका विकास’ म्हणाल, तर आपल्या सहकारी पक्षांनाच युगपुरुषांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. आपल्याच प्रतिमेच्या प्रेमात ते आहेत. त्यामुळे पुढील काळात स्वतःच्या पराभवाला ते स्वतःच जबाबदार असतील.

सूर्यकांत केशव शानभाग, बेळगाव

वास्तवाशी नाते जोडणारे संपादकीय
सकाळ  साप्ताहिकच्या २५ ऑगस्टमधील अंकातील संपादकीय ’होय, टुगेदर वुई कॅन’ वास्तवास धरून आहे. हे संपादकीय खूप आवडले. या संपादकीयमध्ये आलेल्या विषयास अनुसरून काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचले होते याचा येथे विशेष उल्लेख करावासा वाटतो. ’नॉट विदाऊट माय डॉटर’ हे त्या पुस्तकाचे नाव. या पुस्तकावर आधारित इंग्रजी चित्रपटपण आहे. हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचावे. ‘साप्ताहिक सकाळ’मधील लेख हे वास्तवाशी नाते जोडणारे असतात त्याबद्घल अभिनंदन आणि आभार.

श्रीरंग कुलकर्णी, सोलापूर

मनमोहक मेंदी विशेषांक
‘सकाळ साप्ताहिक’चा मेंदी विशेषांक (१८ ऑगस्ट) पाहण्यात, वाचनात आला. मुखपृष्ठासह आतील पाने मेंदीने रंगलेली वाटली. मेंदी लावण्याच्या आकृतींपासून ते मेंदीचा रंग खुलण्यापर्यंतच्या ’लावण्या’चे येथे दर्शन होते. स्पर्धेत सहभागी झालेल्यांचे मेंदी आणि सौंदर्यांबद्दलचे ज्ञान विशेष कौतुकास्पद असून मेंदीबरोबरच त्यांचे भावविश्‍वही खुलून रंगलेले असे जाणवले. खरोखर मनमोहक असा हा अंक आहे. परीक्षकांनी मांडलेली नावीन्यपूर्ण संकल्पना, मेंदीच्या संदर्भात प्रात्यक्षिक मुद्दे, नोंदीसह सखोल अभ्यासदृष्टी दर्शविणारी आहे. स्पर्धक, परीक्षक, संपादक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

       वर्षा व्यंकटेश वळसंगकर, गुलबर्गा (कर्नाटक)

संबंधित बातम्या