वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

व्यक्तिचित्रण भावले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिचित्रण असणारा ‘आश्‍वासक चेहरा’ हा मृणाल नानिवडेकर यांचा लेख वाचला. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे ही फार मोठी नावे आहेत. देशाच्या राजकारणात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मला कोणताही नेता या उंचीवर जाईल असे वाटत नाही. मात्र फडणवीस त्याला अपवाद म्हणावे लागतील. कारण कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातून जर कोणी पंतप्रधानपदाच्या असतील तर त्यात फडणवीस यांचे नावे सर्वात वरच्या क्रमांवर असेल.
रवींद्र जोशी, कर्वेनगर, पुणे

विचारांना चालना देणारी व्यंगचित्रे 
 सकाळ साप्ताहिकचा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. यातील विजय पराडकर यांची व्यंगचित्रे विचारांना चालना देणारी आहेत. अस म्हणतात, की एक व्यंगचित्र हे दहा अग्रलेखाइतके प्रभावी असते. पराडकरांची व्यंगचित्रे पाहिल्यावर हे वाक्‍य मनोमन पटते. अंकातील सर्वच लेख वाचनीय आहेत.                      
सां. रा. वाठारकर,  चिंचवड

पृथ्वीच्या संघर्षाला सलाम
‘सकाळ साप्ताहिक’ अंकातील सर्वच लेख वाचनीय असतात. २० ऑक्‍टोबरच्या अंकातील  पृथ्वी शॉ याच्या कामगिरीची माहिती देणारा क्रीडांगण सदरातील क्रिकेटमध्ये ‘पृथ्वी’राज हा लेख विशेष आवडला. कमी वयात ऐवढी मोठी झेप पृथ्वीने कशी घेतली? याची माहिती या लेखात वाचली. लहान वयात पृथ्वीने केलेल्या संघर्षाचे कौतुक वाटते.
सागर सद्रे, सोलापूर

वाचनीय अंक
‘सकाळ साप्ताहिक’चा प्रॉपर्टी विशेष हा अंक वाचला. यातील ‘रेरानंतरचा बांधकाम व्यवसाय’ हा संजय देशपांडे यांचा लेख आवडला. रेरा फक्त ग्राहकांच्याच नाही तर बांधकाम व्यावसायिकांच्याही फायद्याचा आहे, हे समजले. रेरा हा कायदा केवळ ग्राहकांच्या फायद्याचा आहे असा एकतर्फी प्रचार केला जात होता. मात्र बांधकाम व्यवसायिक आणि ग्राहक या दोघांच्याही हिताच विचार या कायद्यात केला असल्याचे वाचून आनंद झाला. अंकातील शहरे आणि गुंतवणूक, पर्यावरणपूरक शहरी गृहरचना, अंगणी माझ्या.., आधुनिक स्वयंपाक घर हे सगळेच लेख वाचनीय आहेत.
राकेश जाधव, धनकवडी, पुणे
 

संबंधित बातम्या