Saptahik Sakal is a name to reckon with in the Marathi Magazine world. Sakal Saptahik has spent the last twenty eight years being the beacon of health nance …
मराठी नियतकालिकांच्या आणि मराठी वाचकांच्या जगात ‘सकाळ साप्ताहिक’ने १९८७पासून आपले असे स्थान निर्माण करीत मराठी वाचणाऱ्या जगभरातल्या वाचकांवर आपला असा एक अमिट ठसा उमटवला आहे. बदलतं बाह्यजीवन, नवीन विषयांबाबत समाजात निर्माण होणारी रुची, औत्सुक्य याची जाण ठेवत, जगभरात घडणाऱ्या घटनांचा अर्थवाही मागोवा घेण्यापासून ते विज्ञान, तंत्रज्ञान, शारीरिक-मानसिक आरोग्य, फॅशन, इतिहास, साहित्य व्यवहार-चित्रपट-नाटक-कला, करिअर, पर्यटन, खाद्यसंस्कृती, अर्थकारण, पर्यावरण, विविध क्षेत्रांमध्ये होणारे नवे प्रयोग अशा कुटुंबातल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडींना स्पर्श करणारे विषय हे ‘सकाळ साप्ताहिक’चे वैशिष्ट्य. ‘सकाळ साप्ताहिक’ने आजवर वेगळे, चाकोरीबाहेरचे विषय जसे हाताळले तसे अनेक विषय-तज्ज्ञांना आणि नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांनाही लिहिते केले. विविध विषयांवरील विशेषांक हे ‘सकाळ साप्ताहिक’चे आणखी एक वैशिष्ट्य. पर्यटन, आरोग्य, लग्नसराई अशा विषयांबरोबरच मेंदी, फराळ यांसारख्या विशेषांकांचे आपण वाचकांनी नेहमीच स्वागत केले आहे. प्रगल्भ अभिरुची आणि वाङ्मयीन स्वरूप जापासणाऱ्या ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकानीही महाराष्ट्राच्या या वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयीन परंपरेमध्ये मोलाची भर घातली आहे.