त्वचा आणि केसांचे आरोग्य

स्वप्ना साने रोजच्या कामाच्या धबडग्यात स्वतःसाठी दहा मिनिटे काढून त्वचेची काळजी घ्यायला हवी. घरच्या घरी काही पॅक तयार करून चेहऱ्याला लावले तर नक्कीच फायदा होईल. केसांवर काही केमिकल ट्रीटमेंट केली असेल तर केसांचीही विशेष काळजी घ्यायला हवी, हेअर स्पा करायला हवा! त्वचा तजेलदार आणि टवटवीत दिसण्यासाठी काही होम मेड रिफ्रेशिंग पॅक लावता येतील का? ऑफिसमुळे स्वतःच्या स्किन केअरसाठी खूप जास्त …

आणखी वाचा...

धर्म नावाची ‘ऑर्डर’

डॉ. सदानंद मोरे अर्थव्यवहार निरंकुश ठेवले तर ते भांडवलशाहीत अभिप्रेत असलेल्या स्वातंत्र्याच्या मुळावर येईल. तसे होऊ नये यासाठी देखरेख व उचित कारवाई करणारी यंत्रणा या नात्याने राज्यसंस्था अपरिहार्य असली तरी राज्यसंस्थेनेच बलिष्ठ होऊन मनमानी करू नये, यासाठी राज्यनिरपेक्ष अशी व्यवस्था अस्तित्वात असली पाहिजे. ती म्हणजेच ‘ऑर्डर’, जिच्या अधीन राहूनच सरकारला अर्थव्यवस्थेचे नियमन, नियंत्रण करता येईल. तिच्या बाहेर जाऊन नव्हे. अर्थशास्त्रज्ञ …

आणखी वाचा...

कैरी

प्रा. विश्वास वसेकर एका कैरीपासून जितके खमंग प्रकार करता येतात, तसे क्वचितच एखाद्या दुसऱ्या फळापासून करता येत असतील. त्यांचे पुन्हा प्रांताप्रांतागणिक अनेक प्रकार आणि नावे आहेत. आम्र नंदनवनीचे विभूषण श्रेष्ठ हिंद फळातील हे फळ अन्य फळे जरी पक्व आम्र जरी न परिपक्व ही चारोळी म्हणजे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे निर्माते डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी चौदाव्या शतकात होऊन गेलेला कवी, भाषातज्ज्ञ अमीर …

आणखी वाचा...

तामिळनाडूचे कांदळवन

दीप्ती योगेश आफळे आमची होडी कालव्यांमधून फिरून आम्हाला खारफुटी जंगलसफर घडवून आणीत होती. वरून खारफुटीच्या फांद्या आणि खालून खारफुटीच्या मुळ्या आणि त्यातून तयार झालेल्या बोगद्यामधूनच आमचा प्रवास सुरू होता. तामिळनाडूच्या सहा दिवसांच्या सहलीचा प्लॅन आखून आम्ही सातजण बंगळूरहून निघालो. सहलीचा भरगच्च कार्यक्रम योगेशने स्वतःच आखला होता. अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या यादीबरोबरच एक पूर्ण दिवस त्याने पिच्छावरमसाठी दिला होता. ‘त्या खारफुटीत काय …

आणखी वाचा...

कॅमेऱ्याची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’

सुहास किर्लोस्कर प्रेक्षकांनी कोणाच्या दृष्टिकोनातून एखादे दृश्य बघावे, यानुसार कॅमेरा लावला जातो. त्याचप्रमाणे ‘कॅमेरा अँगल’नुसार म्हणजेच कोणत्या कोनातून चित्र दिसते त्यानुसार प्रेक्षकांची दृष्टी बदलते, त्या दृश्याचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटात राज मल्होत्राचे (शाहरुख खान) सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘राज, अगर ये तुझे प्यार करती है, तो पलट के देखेगी’. या वाक्यावर सिमरन (काजोल) राज मल्होत्राला जशी …

आणखी वाचा...

अजून चालतोचि वाट..!

डॉ. बाळ फोंडके अयोग्य पर्यावरणापासून आपला बचाव करण्याची कामगिरी वैद्यकीय तंत्रज्ञान इमानेइतबारे पार पाडत आहे. या तंत्रज्ञानाचा विकास गेल्या एका शतकामध्येच झाला आहे. त्यामुळं जगाच्या बहुतांश भागात नैसर्गिक निवडीला आवर घातला गेला आहे का? उत्क्रांतीच्या या कळीच्या अंगाची मुस्कटदाबी करण्यात आली आहे का? नैसर्गिक वारशाची कहाणी संपली आहे का?… चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य नसणारी अनेक मंडळी आजही आहेत. वानरांपासून …

आणखी वाचा...

महायोग्याचा जन्म व स्थान…

डॉ. राहुल हांडे जन्मस्थान आणि काळ यासंदर्भातील वादांच्या पलीकडे महायोगी गोरक्षनाथ भारताच्या आध्यात्मिक व सामाजिक इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व होते. त्यामुळे ह्या पर्वाचे सर्वांगीण आकलन करून घेणे आवश्यक ठरते. नदीचा विस्तीर्ण प्रवाह शांतपणे वाहत आहे. तिच्या शांत काठावर आज मात्र एक वेगळीच हालचाल जाणवत होती. केवळ एक लंगोटी परिधान केलेली आणि गळ्यात रुद्राक्ष माळा घातलेली योग्यांची एक टोळी तिच्या काठावर …

आणखी वाचा...

कॅलिडोस्कोप…

आदित्य दातार काहीजण आख्ख्या सभोवतालाचं पॅनोरामा स्केच काढतात, तर काही चारकोल पेंटिंग अथवा वॉटर कलरशी सलगी करतात. काहींना समोरील दृश्यातला एखादा मोजकाच भाग कागदावर उतरवावासा वाटतो, तर काही फक्त काळी शाई, पिवळाजर्द रंग किंवा कधी चक्क गुलाबी शाई वापरून सुरेख चित्र गिरवतात. काही मंडळींच्या चित्रांमधून जमलेल्या चित्रकारांचीच भन्नाट रेखाचित्रं डोकावतात व इतर काहींची चित्रं तर कागद बिगद विसरून पार शर्ट/जर्सीवर …

आणखी वाचा...

वाळवणं

सुजाता नेरूरकर   वाफवलेल्या साबुदाणा पापड्या साहित्य : दोन कप साबुदाणा, मीठ चवीनुसार, केशरी व हिरवा किंवा आपल्या आवडीनुसार रंग, इडली पत्राला लावण्यासाठी तेल, पापड्या वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिक पेपर. कृती : रात्री साबुदाणा धुऊन मग त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढे पाणी घालून झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाणा पापड्या करण्याअगोदर भिजवलेल्या साबुदाण्यात चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. मग त्याचे एकसारखे तीन …

आणखी वाचा...

ओले वाळवण-निर्मितीचा आनंद!

संजीवनी बोकील नवनिर्मितीचा आनंद मग तो कवितेचा असो की उन्हाळी वाळवणाचा! सुलट्या भिंगातून बघायचा!! मोठ्ठा करून उपभोेगायचा!!! परवा मैत्रिणीचा अडीच वर्षांचा नातू दुडूदुडू धावत हातातली पाटी दाखवायला आला. पाटीवर दुधी पेन्सिलने त्याने काही रेघोट्या मारलेल्या होत्या. ती पाटी माझ्यासमोर धरताना तो म्हणाला, “हम्मा ह्ये…” आपली ती नवनिर्मिती दाखवताना त्याचा चेहरा अभिमानाने फुलला होता. आपली पाटी घेऊन सोहम गेला, पण तो …

आणखी वाचा...
error: Content is protected !!