कॅलिडोस्कोप…

आदित्य दातार काहीजण आख्ख्या सभोवतालाचं पॅनोरामा स्केच काढतात, तर काही चारकोल पेंटिंग अथवा वॉटर कलरशी सलगी करतात. काहींना समोरील दृश्यातला एखादा मोजकाच भाग कागदावर उतरवावासा वाटतो, तर काही फक्त काळी शाई, पिवळाजर्द रंग किंवा कधी चक्क गुलाबी शाई वापरून सुरेख चित्र गिरवतात. काही मंडळींच्या चित्रांमधून जमलेल्या चित्रकारांचीच भन्नाट रेखाचित्रं डोकावतात व इतर काहींची चित्रं तर कागद बिगद विसरून पार शर्ट/जर्सीवर …

आणखी वाचा...

नवचित्रकलेचा प्रवर्तक सेझान

डॉ. सुहास भास्कर जोशी चाळिशी उलटून गेली तरी ज्याचं चित्र कोणी एक डॉलरलाही विकत घ्यायला तयार नव्हतं, त्याचं ‘कार्ड प्लेअर्स’ मालिकेतील एक चित्र २०१२ साली २५ कोटी डॉलरना विकलं गेलं. म्हणजे आजच्या बाजारपेठेत त्याचं मूल्य झालं सुमारे -२,००० कोटी रुपये …! “हे जग क्रूर, हलकट माणसांनी भरलेलं आहे. ते मला समजून घेत नाही, आणि मलाही ते जाणून घेण्याची इच्छा नाही. …

आणखी वाचा...

मोनेच्या वॉटरलिलीज

डॉ. सुहास भास्कर जोशी मोनेच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी वॉटरलिलीज लोकांना पाहण्यासाठी खुल्या झाल्या. आणि काहीशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. एकीकडं ‘इंप्रेशनिझमची मायकेलअँजेलोच्या सिस्टीन चॅपेलच्या तोडीची अद्‍भुत कामगिरी’ असं अफाट कौतुक, आणि दुसरीकडं ‘म्हाताऱ्या माणसाचं ‘डल’ काम’ अशी जहरी टीका, हे दोन्ही वॉटरलिलीजना ऐकावं लागलं. काही दशकं ही चित्रं विस्मरणात गेली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकी अमूर्त चित्रकार जॅकसन पोलॉक …

आणखी वाचा...

लोकोत्तर बहुआयामी प्रतिभावंत

डॉ. सुहास भास्कर जोशी ता. ८ एप्रिल हा जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोचा पन्नासावा स्मृतिदिन. आज इतक्या दशकांनंतरही पिकासोच्या चित्रांनी लहान-मोठे चित्रकार, जाणकार समीक्षक आणि कलारसिकांवर केलेले गारुड अजून कमी झालेले नाही, आणि पुढेही होणार नाही. न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन भागातील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टची इमारत समोर दिसली, आणि अमेरिकेत मुलाकडं येण्याचं सार्थक झालं, असं मला वाटलं. पिकासोच्या ‘दम्वाझेल’चं ‘याची देही, याची …

आणखी वाचा...

रेंब्राची अव्यभिचारी निष्ठा

डॉ. सुहास भास्कर जोशी वयाच्या ६३व्या वर्षी रेंब्राचा मृत्यू झाल्यानंतर सरकार दरबारी नोंद करण्यात आली- ‘आज ४ ऑक्टोबर, १६६९ रोजी रेंब्रा या वृद्ध, निर्धन आणि अनाथ चित्रकाराचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्याच्याजवळ फक्त अंगावरचे लोकरीचे कपडे आणि चित्रकलेचे साहित्य एवढ्याच गोष्टी होत्या.’ चित्रकलेच्या इतिहासातील ‘शेक्सपिअर’ असं ज्याला संबोधलं जातं, तो रेंब्रा (Rembrandt) हा सतराव्या शतकातील डच चित्रकलेच्या सुवर्णयुगाचा सर्वोच्च सर्जनशील कलावंत …

आणखी वाचा...

विक्षिप्त नि अभागी प्रतिभावंत

लेखक : डॉ. सुहास भास्कर जोशी बरोक शैली आणि कायरोस्क्यूरो तंत्र याचं सर्वोत्तम उदाहरण असणारे ‘बीहेडिंग ऑफ सेंट जॉन द बॅप्टिस्ट’ हे चित्र युरोपियन कलाविश्वातील एक अत्यंत महत्त्वाची कलाकृती तर आहेच, पण जोनाथन जोन्स या कलासमीक्षकाच्या म्हणण्यानुसार जगातील सार्वकालिक दहा महान कलाकृतींमध्ये समावेश करण्याच्या योग्यतेचे आहे. आयुष्याची शेवटची वर्षं कायम मृत्यूच्या सावटाखाली काढणाऱ्या कॅराव्हॅजिओची अखेरची काही महत्त्वाची चित्रं शिरच्छेदाचीच असावीत, …

आणखी वाचा...

राफाएलचे ‘स्कूल ऑफ अथेन्स’

लेखक : डॉ. सुहास भास्कर जोशी ‘स्कूल ऑफ अथेन्स’ या भव्य चित्रकृतीचा विषय तर विलक्षण आहेच, पण असंख्य व्यक्तिरेखांची समूहरचना, भव्य स्थापत्यकलेचा आभास दाखवणारी मांडणी, विलक्षण यथार्थदर्शन, भौमितिक अचूकता, प्रभावी रंगसंगती या सर्वांमुळे ही चित्रकृती महान ठरली आहे. नमस्कार! व्हॅटिकन म्युझियममधील या ‘राफाएल रूम’मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. ‘रेनेसाँ’ काळातील महान प्रतिभावंत चित्रकार राफाएल सॅन्झिओ याची ऑल टाइम ग्रेट …

आणखी वाचा...
error: Content is protected !!