कॅमेऱ्याची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’

सुहास किर्लोस्कर प्रेक्षकांनी कोणाच्या दृष्टिकोनातून एखादे दृश्य बघावे, यानुसार कॅमेरा लावला जातो. त्याचप्रमाणे ‘कॅमेरा अँगल’नुसार म्हणजेच कोणत्या कोनातून चित्र दिसते त्यानुसार प्रेक्षकांची दृष्टी बदलते, त्या दृश्याचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटात राज मल्होत्राचे (शाहरुख खान) सुप्रसिद्ध वाक्य आहे, ‘राज, अगर ये तुझे प्यार करती है, तो पलट के देखेगी’. या वाक्यावर सिमरन (काजोल) राज मल्होत्राला जशी …

आणखी वाचा...

कॅमेराअँगल

सुहास किर्लोस्कर कॅमेरा कसा वापरायचा, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हालता हे चित्रपटातील प्रसंग, विशिष्ट पात्राचे त्या प्रसंगातील स्थान, प्रसंगामधील भाव यावर ठरते. एखादे चित्र काढण्यापूर्वी आपण ते चित्र कोणत्या बाजूने, कोणत्या कोनातून बघतो आहोत, हे ठरवणे गरजेचे असते. लहानपणी निसर्गचित्र काढताना आपण दोन डोंगर, त्यामधून उगवलेला सूर्य, डोंगरातून वाहणारी नदी, नदीकाठावर एक टुमदार घर असे चित्र रेखाटल्याचे आठवत असेलच. मात्र …

आणखी वाचा...

क्लोज-अप

सुहास किर्लोस्कर क्लोज-अप शॉटमध्ये पार्श्वभूमी दाखवली जाते, त्यावेळी त्याचा परिणाम वेगळा होणे अपेक्षित असते. कमीत कमी संवादातून त्या पात्राचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोचवायलाही क्लोज-अप शॉटची मदत होते. नाटक बघताना प्रेक्षक रंगमंचावर कुठेही बघू शकतात. एखादे पात्र संवाद म्हणत असले तरीही नाटकाचा प्रेक्षक दुसऱ्या पात्राकडे बघू शकतो. रंगमंचाच्या उजव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना एखाद्या पात्राचा चेहरा दिसत असेल तर डाव्या बाजूला बसलेल्या प्रेक्षकांना …

आणखी वाचा...

सिंड्रेलाची गोष्ट

इरावती बारसोडे ओटीटीवर नुकताच एक चित्रपट माझ्या पाहण्यात आला. या चित्रपटातल्या नायिकेचं उत्तम फॅशन डिझायनर व्हायचं स्वप्नं आहे. त्यासाठी ती खूप मेहनतही करतेय, आणि लवकरच ती मेहनत सार्थकीही लागणार आहे. तिला परदेशी जाऊन तिची कला दाखवायची संधी मिळणार आहे. या प्रवासात तिचा प्रियकरही तिला साथ देणार आहे, आणि तेही राजसत्तेवर पाणी सोडून! लग्नाबिग्नाचं नंतर बघू असं त्यांनी ठरवलंय… ही गोष्ट …

आणखी वाचा...

कॅमेऱ्याची भाषा

सुहास किर्लोस्कर चित्रपटातील एक शॉट अनेक कॅमेऱ्यांनी शूट केला जातो. आपण जे दृश्य पडद्यावर बघतो, त्याची व्याप्ती/ खोली किती आहे, त्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर परिणाम होत असतो. प्रत्येक दृश्यामध्ये आपल्याला काय आणि किती तपशिलात दाखवायचे आहे, हे दिग्दर्शकाला माहीत असते. ब्रिटिश साम्राज्याने आकारलेल्या जुलमी कराच्या विरोधात लढाईचा एक भाग म्हणून एका छोट्या गावातला भुवन ब्रिटिशांनाच क्रिकेट सामन्याचे आव्हान देतो, गावकऱ्यांमधून एकेक …

आणखी वाचा...

पहिली आशियायी ऑस्कर विजेती

केतकी जोशी कला ही कुणा एकाची मक्तेदारी नसते आणि उत्तम कलाकार जगात कुठेही असला तरी स्वतःला सिद्ध करतोच, ऑस्कर विजेत्या मिशेल योहच्या उदाहरणावरून हेच तर सिद्ध होतं. यंदाच्या ऑस्कर अवॉर्ड्सच्या सोहळ्यात आणि नंतर आपल्याकडे चर्चा रंगली ती आरआरआरमधल्या सर्वोत्कृष्ट अस्सल चित्रपटगीताची, ‘नाटू नाटू’ची, ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी ‘एलिफंट व्हिस्परर्स’ची आणि दीपिका पादुकोणच्या स्टाइल आणि अँकरिंगची… मात्र या सोहळ्यात सर्वांत जास्त सात …

आणखी वाचा...

‘तोरा मन दर्पण कहलाए’

सुहास किर्लोस्कर चित्रपटातले एखादे पात्र काही विचार करत आहे, हे दिग्दर्शक संवादाशिवाय कसे दाखवू शकतो? बऱ्याच चित्रपटात अशा प्रसंगावेळी ते पात्र आरशात बघत आहे, असे दाखवले जाते. आरशाचा एवढा एकच वापर होईल? वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आरसा कोणकोणत्या अभिनव पद्धतीने वापरला आहे? ‘डक सोप’ या १९३३ साली रिलीज झालेल्या लिओ मॅकारे दिग्दर्शित चित्रपटात मार्क्स बंधूनी आरशाचा एक धमाल प्रसंग सादर केला होता. …

आणखी वाचा...

सुंदर ती दुसरी दुनिया..!

लेखक : प्रवीण टोकेकर डिस्नेविश्वाच्या निर्मितीच्या प्रारंभीच्या क्षणांना यंदा शंभर वर्षं पूर्ण होतील. ‘इमॅजिनिअरिंग’ – इमॅजिनेशन आणि इंजिनिअरिंगचा एक कल्पक मिलाफ डिस्नेनं जगासमोर ठेवला. ‘डिस्ने रेनेसाँ’ उभा करताना तंत्रज्ञानाबरोबर फरफटत न जाता डिस्नेच्या कलावंतांनी आशयाला मात्र ढका लागू दिला नाही. घराच्या परसदारातल्या बागेत झुडपात खसखस झाली म्हणून ॲलिसनं बघितलं तर – ससा! अबदुल-गबदुल ससा, ससा स.. ससा की कापूस जसा! …

आणखी वाचा...

…रंग माझा वेगळा

लेखक : सुहास किर्लोस्कर कोणत्या वेळी कोणते रंग वापरावे याचे ठोकताळे असे काही ठरलेले नसतात. काही कलाकार-तंत्रज्ञ रंगांचा वापर अधिक उपक्रमशिलतेने करतात. रंगीत चित्रपटांच्या गर्दीत काही दिग्दर्शकांनी कृष्ण-धवल तंत्राचा (ब्लॅक ॲण्ड व्हाइट) वापर काही विशिष्ट हेतूने केला आहे. हर रंग कुछ कहता है। प्रत्येक रंगाचा आपल्या मानसिकतेशी काही संबंध असतो, त्याचा वापर चित्रपट दिग्दर्शक करतात. लाल रंग प्रेम, आवड, ध्यास, …

आणखी वाचा...

टायटल्स: सुरुवात चुकवू नका

लेखक – सुहास किर्लोस्कर चित्रपटाच्या सुरुवातीला तीनएक मिनिटांतच दाखवल्या जाणाऱ्या श्रेयनामावलीचा अनेक दिग्दर्शकांनी कल्पकतेने उपयोग करून घेतलेला दिसतो. चित्रपटात पुढे काय होणार आहे याचे सूतोवाच टायटल्समध्ये, चित्रपटाच्या पहिल्या तीन मिनिटांच्या प्रसंगामध्ये, केलेले असते.  वाफेचे इंजिन असणारी रेल्वे एका स्टेशनवर थांबते, तिथे प्रवाशांची गर्दी नाही. कोळशावर चालणारी, धूर ओकणारी रेल्वे लांबून येताना आपण उंचावरून बघतो, कॅमेरा वरून जमिनीवर येतो, रेल्वेमधून एक …

आणखी वाचा...
error: Content is protected !!